माफी मागण्याच्या स्टाईलनं अभिनेत्याच्या प्रेमात पडली अभिनेत्री; शेवटी गुरूजींना पैसे देऊन उरकलं लग्न!
Archana Puran Singh: बॉलिवूडमध्ये अशा अनेक लोकप्रिय लव्ह स्टोरीज गाजल्या आहेत. त्यातील एक लव्ह स्टोरी आहे ती म्हणजे अर्चना पूरण सिंग यांची. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या हटके लव्ह स्टोरीबद्दल.
Archana Puran Singh: बॉलिवूडच्या अनेक युनिक लव्ह स्टोरीज तुम्हाला माहिती असतीलच. परंतु अशा दुसऱ्या अनेक बॉलिवूडच्या प्रेमकहाण्या आहेत ज्याबद्दल कदाचित तुम्ही कधी ऐकलेही नसेल परंतु त्या तुम्हाला जाणून घेऊन फार गंमत वाटेल. अशीच एक प्रेमकहाणी आहे ती म्हणजे अर्चना पूरण सिंग यांची. आज अर्चना पूरण सिंग यांची वेडिंग एन्व्हर्सी आहे. यानिमित्तानं जाणून घेऊया त्याच्या लव्ह स्टोरीबद्दलच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी.
1992 साली त्यांचे अभिनेता परमित सेठीसोबत लग्न झाले होते. परंतु याआधी अर्चना पूरण सिंग यांचे पहिले लग्नही झाले होते. परंतु ते लग्न फार काही काळ टिकले नाही. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. अर्चना आणि परमीत यांची ओळख पहिल्यांदा एक इव्हेंटमध्ये झाली होती. कपिल शर्माशी बोलताना अर्चना पुरण सिंग म्हणाल्या होत्या की, मी एका पार्टीत परमीतला भेटले होते. त्यावेळी माझ्या हातात एक मॅगजीन होती. ती माझ्या हातून परमीतनं खेचून घेतली. त्यामुळे मला प्रचंड राग आला होता. परंतु परमीतनं अशाप्रकारे माफी मागितली की माझा संपुर्ण राग निघून गेला. त्यावेळीच त्यांच्या प्रेमाची सुरूवात झाली.
अर्चना पूरण सिंग यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून कामं केली आहेत. त्यामुळे त्यांची कायमच चर्चा रंगलेली असते. सध्या त्या कपिल शर्माच्या शोमध्ये आहेत. आपल्या हास्यानं त्या प्रेक्षकांना घायाळ करून सोडतात. त्यांनी अनेक विनोदी मालिकांमधून आणि चित्रपटांतून मोठमोठे रोल्स केले आहेत. त्यांच्या विनोदाचेही अनेक जणं फॅन्स आहेत. अर्चना पूरण सिंग आपल्या डॅशिंग व्यक्तिमत्त्वासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या फॅशनस्टाईलचेही अनेक जण फॅन्स आहेत.
हेही वाचा - 'अजून काही ठरलं नाही', मुग्धा-प्रथमेश अखेर खरं बोलले...
परमीत यांनी कपिल शर्मा यांना सांगितले होते की, सुरूवातीला आम्ही दोघंही हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होतो. आम्ही आमच्याबद्दल आमच्या घरच्यांना सांगितले तेव्हा आमच्या घरच्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तेव्हा आम्ही रात्री 11 वाजताचा निर्णय घेतला आणि लग्नासाठी गुरूजींचा शोध घेतला. त्यानंतर तासाभरानं म्हणजे 12 वाजता आम्हाला गुरूजी भेटले. तेव्हा त्या गुरूजींनी आम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही पळून जाऊन लग्न करतायत का? तेव्हा आम्ही सांगितलं की आम्ही सुजाण नागरिक आहोत. आम्हाला लग्न करायचंय परंतु गुरूजींनी असं लग्न होऊ शकत नाही असं सांगितले. ते म्हणाले की मुहूर्त आधी निघेल आणि मग लग्न लागेल. तेविहा आम्ही त्यांना पैसे दिले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता आम्ही लग्न केले.