Leaders : एका सर्व्हेनुसार, मुंबईत दररोज 20 हजारहून अधिक लोक कामाच्या शोधात येतात. त्यात अनेक लोक फिल्म इंडस्ट्रीत आपलं करिअर बनवण्यासाठी येतात. म्हणजेच एका वर्षात लाखो लोक हिरो बनण्याचं स्वप्न घेऊन मुंबईत दाखल होतात, पण त्यातील काही मोजके लोक आपलं धैय गाठतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही त्या लिडरची स्टोरी आहे, ज्याची आज मुंबईतच नव्हे तर जगभरात एक खास ओळख आहे, तो म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी  अक्षय कुमार... अक्षय कुमारने कधीच विचार केला नव्हता की तो अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवेल, आणि एक मोठा अभिनेता होईल. पण जर कोणी मेहनत आणि प्रामाणिक पणे कोणतं काम करत असेल तर त्याला सफलता नक्कीच मिळते.


तेच अक्षयच्या बाबतीत ही घडलं. अक्षय कुमारचं खरं नाव राजीव भाटीया आहे. त्याचा जन्म पंजाबमध्ये झाला. अक्षयने त्याचं बालपण  दिल्लीतील चांदणी चौकमधील गल्लीत घालवलं आहे.


तो अभ्यासात तितका चांगला नव्हता. त्यामुळे 12 वीनंतर त्याने शिक्षण सोडून दिलं. त्यानंतर स्वत:च्या खरचा साठी छोटं मोठं काम करु लागला. खेळामध्येही त्याला रस होता. त्यामुळे मार्शल आर्ट्सच्या ट्रेनिंगसाठी तो बँगकोकला निघून गेला. आणि तिकडे अपजीविकेसाठी तो हॉटेलमधील जेवण बनवण्याचं काम करु लागला. 


त्याने शेफचा जॉब केला. त्यासोबतच तो अनेक छोटी-मोठी काम देखील करत होता. त्यानंतर तो कोलकत्तामध्ये तो आला, आणि एका  ट्रॅव्हर एजन्सीमध्ये ही त्याने काम केलं. कोलकत्तामधून त्यानंतर अक्षय मुंबईत आला. आणि त्याने कुंदनचे दागिने विकायला सुरुवात केली.


जे तो दिल्लीतून आणत होता. तो मेहनत करुन पैसे कमवत होता. कुंदनचे दागिने तो विकत असताना तो लहान मुलांना मार्शल आर्टसचं प्रशिक्षण देत होता. यावेळीच एका फोटोग्राफस मित्राने त्याला मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. आणि मॉडेलिंग प्रोजेक्टसाठी त्याचं नाव दिलं.


त्याचं सिलेक्शन देखील झालं. त्यानंतर अक्षयने 2 दिव,सात शूट पुर्ण केलं, ज्याचे त्याला 20 हजार रुपये मिळाले. पुर्ण महिनाभर काम करुन 5 हजार मिळत असताना मॉडेलिंग करुन जर 2 दिवसात 20 हजार मिळत असतील तर हे काम आपण पुढे चालू ठेवायला हवं. याचं कामात आपलं करिअर बनवायचं आहे. त्यानंतर तो काही प्रोजेक्ट करत गेला. एका अक्षयला मॉडेलिंगसाठी बँग्लोरला जायचं होतं.पण त्याची फ्लाईट मिस झाली आणि त्याच्या हातातील मोठा प्रोजेक्ट निघून गेला. त्यामुळे तो खूप दु:खी झाला. 


पण त्याच्या वडिलांनी त्याला समजावलं की, जे होतं ते चांगल्यासाठीच... त्यानंतर अक्षय आपला पोर्ट फोलिओ घेऊन नटराज स्टुडिओमध्ये गेला. तिथे प्रमोद यांच्याकडे काम करणारा मेकअप आर्टिस्ट त्यांना भेटला. त्याने अक्षयचे फोटो प्रमोद यांना दाखवले. त्यांना अक्षयचे फोटो फार आवडले.त्यांनी अक्षयला स्टुडिओच्या आत बोलावला. आणि अक्षयला एक छोट्या रोलसाठी काम करणार का असा प्रश्न विचारला.



अक्षयने लगेचच होकार दिला. अक्षयला तेव्हा 5 हजाराची रक्कम देण्यात आली आणि प्रोजेक्टसाठी साईन करण्यात आलं.या घटनेनंतर अक्षय नेहमी म्हणतो की, ऊपर वाला ही सबसे बडा स्क्रिप्ट राईटर आहे. त्यानंतर अक्षयने अॅक्टींग कोर्स जॉईन केला. या दरम्यान फिल्म आज साठी अक्षयला एक छोटा रोल मिळाला, पण जेव्हा फिल्म रिलीज झाली. तेव्हा अक्षयचा सीन फक्त 7 सेकंदाचा दिसला.



या सिनेमातील हिरोचं नाव अक्षय होतं. हे नाव राजीव भाटीयाला फार आवडलं आणि त्याने आपलं नाव अक्षय ठेवलं. अशाप्रकारे तो अक्षय कुमार बनला.


1991 मध्ये सौगंद या सिनेमात लीड रोल करत अक्षयने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केला. त्यानंतर 1992 मध्ये खिलाडी त्याचा हा सिनेमा हिट झाला. अक्षयने या सिनेमानंतर मागे वळून पाहिलं नाही. आणि 22 ते 23 वर्षात त्याने 130 पेक्षा जास्त सिनेमे केले. या लिडर्स स्टोरीचं तात्पर्य हे आहे, की आपण प्रामाणिकपणे मेहनत केली तर नक्कीच यश मिळतं आणि कष्टाचं सोनं होतं.