`औरों में कहां दम था` ची सुरुवात निराशजनक, 2 दिवसांमध्ये फक्त `इतकी` कमाई
अजय देवगण आणि तब्बूचा `औरों में कहां दम था` चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाची सुरुवात खूपच खराब झाली आहे. 15 वर्षांमधील अजय देवगनचा हा चित्रपट सुरुवातीलाच निराशजनक ठरला आहे.
Auron Mein Kahan Dum Tha : दोन दिवसांपूर्वी अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांचा 'औरों में कहां दम था' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याच दिवशी अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'उलझ' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर सुरुवात ही निराशजनक झाली आहे. अभिनेता अजय देवगण आणि तब्बू यांचा 'औरों में कहां दम था' पहिल्याच दिवशी फ्लॉप ठरला आहे. गेल्या अनेक वर्षांमधील अजय देवगणचा हा चित्रपट खराब ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे.
'औरों में कहां दम था' हा चित्रपट निराशजनक ठरला आहे. हा चित्रपट यापूर्वी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. आता, हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल. मात्र, चित्रपटाच्या सुरुवातीच्या दिवशीच थिएटरमध्ये 100 पैकी 80 जागा या रिकाम्या दिसल्या.
'औरों में कहां दम था' ची दोन दिवसाची कमाई
प्राथमिक माहितीनुसार, 'औरों में कहां दम था' या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये फक्त 4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर जगभरात या चित्रपटाने 5 कोटींचा आकडा गाठला आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.85 कोटींची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी हा आकडा केवळ 2.15 कोटींवर पोहोचला. त्यामुळे या चित्रपटाला 100 कोटींची कमाई करण्यासाठी खूप कठीण जाणार आहे.
'उलझ' चित्रपटाची कमाई किती?
2 ऑगस्ट रोजी अभिनेत्री जान्हवी कपूरचा 'उलझ' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये 2.85 कोटींची कमाई केली आहे. जगभरात या चित्रपटाने केवळ साडेतीन कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे जान्हवी कपूरचा हा चित्रपट देखील हिट ठरेल की नाही हे सांगणे कठीण आहे.