मुंबई : सेलिब्रिटी डान्स रिएलिटी शो 'झलक दिखला जा 10' हा टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय शो आहे. सेलिब्रिटींनी आपल्या डान्सने स्टेजला ज्या पद्धतीने आग लावली, ती चाहत्यांना पटली आहे. करण जोहर (Karan Johar), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि नोरा फतेही (Nora Fatehi) यांनी जज केलेला हा रिअॅलिटी शो केवळ डान्ससाठीच नाही तर खूप मजाही आणणारा आहे. जजपासून स्पर्धकांपर्यंत सर्वजण शोमध्ये मजेदार तडका जोडण्यात व्यस्त असतात. गेल्या एपिसोड्समध्ये झलकच्या स्टेजवर खूप धमाल झाली. कारण हा एपिसोड 'कपूर स्पेशल' होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेलिब्रिटी डान्स रिएलिटी शो झलक दिखला जा
बॉलिवूड अभिनेत्री नीतू कपूर 'झलक दिखला जा 10' (Jhalak Dikhhla Jaa 10) च्या कपूर स्पेशल एपिसोडमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. करण जोहरने नीतू कपूर  (Neetu Kapoor)यांचं शोमध्ये स्वॅगसह स्वागत केलं. करणचा नीतू आणि तिच्या कुटुंबाशी चांगला संबंध आहे. अशा परिस्थितीत त्याने नीतूसोबत स्टेजवर खूप मजा केली आणि कपूर कुटुंबाशी संबंधित मजेदार गोष्टीही विचारल्या.


 तैमूर अली खानच्या आयाचा पगार
करणने नीतूला विचारलं की, करीना कपूरचा (Kareena Kapoor) मोठा मुलगा तैमूर अली खानच्या  (Taimur Ali Khan) नानीला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त देते का? तसं असेल तर ती तैमूरच्या आयाचं Taimur Ali Khan Nanny Salary) काम करायलाही तयार आहे. यावर उत्तर देत नीतू म्हणते की, तुम्हाला काय आहे. तिने दोन कोटी द्यावे किंवा पाच कोटी द्यावेत. मला कसं माहिती असेल.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


यानंतर करण नीतूला पुढचा प्रश्न विचारतो, "तू भाजी विक्रेत्याशी भांडण करतेस का?" प्रत्युत्तरात नीतू सहमत आहे आणि म्हणते की, तिला खूप मजा येते. करणने माधुरीला विचारलं आणि तिने सुद्धा सांगितलं की, ती फुकट कोथिंबीर पण मागते.