मुंबई : NCB च्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी रेव पार्टी होणार होती. त्यावेळी त्याजागी 1200 ते 1300 लोकं उपस्थित होत. मात्र NCB त्या 1300 लोकांच्या गर्दीत त्यांना मिळालेल्या टिपनुसार 'त्या' 8 ते 10 लोकांच्या शोधात होती. त्यामध्ये आर्यन शाहरूख खानचं नाव देखील अगदी स्पष्ट होतं. आर्यन आणि अरबाज मर्चंटवर खास लक्ष ठेवण्यासाठी NCB चे अधिकारी तैनात होते. कारण या प्रकरणाची टीप NCB ला अगोदरच मिळाली होती. 


NCB च्या अधिकाऱ्यांना कधी मिळाली होती टीप? 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्यन खानच्या नावाने कोणतीच वेगळी अशी रूम बूक नव्हती. मात्र आयोजकाने आर्यन खान आणि अरबाज मर्चंटकरता खास एक रूम आयोजित केली होती. जशी ही दोघं त्या खास कॉम्प्लीमेंट्री रूममध्ये जाऊ लागले तशी NCB छ्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर धा़ड टाकली. 


ज्यावेळी त्या दोघांचा तपास कऱण्यात आला तेव्हा आर्यन खानकडे काहीच सापडलं नाही. मात्र अरबाज मर्चंटच्या शूजमध्ये चरस सापडलं. NCB ने या दोघांचे मोबाइल ताब्यात घेतले. तेव्हा या दोघांमध्ये चरस घेण्यावरून चॅट झालं होतं. तसेच आर्यन खानने आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं देखील आहे. 


आर्यन खान आणि अरबाज मर्चंट ड्रग्स पॅडलरच्या संपर्कात असल्याची माहिती NCB च्या अधिकाऱ्यांना खूप आधीच मिळाली होती. NCB या शोधात अनेक दिवसांपासून होती. 


शाहरूखच्या मुलाचं आर्यनचं आज काय होणार? 



NCB शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह आणखी तिघांना रविवारी अटक केली आहे. अटक केलेल्या या 8 जणांची पोलीस कोठडी संपणार आहे. या प्रकरणात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर कळणार की, आर्यनला जामीनावर सुटका मिळणार का? की त्याच्या अडचणीत आणखी वाढ होणार. आर्यन खानसह इतरांना देखील कोर्टात सादर करणार आहेत. 


अशी सुरू होती NCB च्या ऑपरेशनची तयारी 



NCB कडून या ऑपरेशनची तयारी गेल्या 15 दिवसांपासून सुरू होती. टीम यासोबत सर्च वॉरंट घेऊनच गेली होती. NCB ची जवळपास 20 ते 22 लोकांची टीम NCB ऑफिसमधून बाहेर निघाली होती. 


पार्टी सुरू होण्याअगोदरच NCB चे अधिकारी साध्या वेशात तेथे पोहोचले होते. पार्टी सुरू होण्या अगोदरच त्यांनी एकेका रूमची तपासणी केली होती. तसेच मिळालेल्या टीपनुसार 1200 ते 1300 लोकांवर लक्ष ठेवून होते. त्यातील 8 लोकांना अटक करण्यात आली.