मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला पॉर्न बिझनेस प्रकरणात पोलीस कोठडी 23 जुलैपर्यंत देण्यात आली आहे. राज कुंद्रावर अश्लिल सिनेमे तयार करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. राज कुंद्रावर अश्लिल धंदा करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज कुंद्रा यांनी हे अश्लिल धंदे लपवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्लॅमरस गोष्टीमागे अनेक काळे धंदे या जगात सुरू आहेत. याचं उदाहरण शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा. लोकांना आतापर्यंत वाटत होतं की, बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा उद्योजोक आहेत. परदेशात त्यांचे व्यवसाय आहेत. मात्र आज त्यांचं गुपित समोर आलं आहे. यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे.  


लोकप्रिय अभिनेत्रीचे पती सगळ्यांपासून लपवून असं काम करत असल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. राज कुंद्राला या प्रकरणात 23 जुलैपर्यंत रिमांडमध्ये ठेवलं आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी राज कुंद्राला अटक केली. मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात कुंद्रा विरोधात कलम 292, 293, 420, 34 आणि भारतीय दंड संहितेचे कलम Information Act आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 67 आणि 67A अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


पोलिसांना अशी मिळाली माहिती 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी अशा अश्लील चित्रपटांद्वारे केवळ मोठी कमाई करत नव्हती तर त्यांनी देशातील कायदा मोडण्याचा प्रयत्नही केला. मुंबई पोलिसांनी यावर्षी 4 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. जेव्हा एका मॉडेलने मुंबईतील मालवणी पोलीस स्टेशन गाठले आणि या रॅकेटबद्दल तक्रार दिली. तक्रारीत मॉडेलने चित्रपट आणि ओटीटीमध्ये काम मिळण्याच्या नावाखाली अश्लील चित्रपटात मुलींना सक्ती कशी करतात हे सांगितले होते. त्यानंतर या धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला.