मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा थेट क्रशच्या लग्नात पोहोचतो आणि तिच्यासोबत लग्न करतो. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ बंगाली मालिका 'ऐ तोबे सोहोचोरी' (Aye Tobe Sohochori) मधील आहे.  हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही कपाळावर हात तर द्यालचं, पण तुमचं हसून पोट देखील दुखू लागेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुगलवर जर तुम्ही, 'How to marry your crush' असं सर्च केलं तर, तुम्हाला मालिकेतील एक क्लिप मिळेल. ज्यामध्ये एक प्रेमी क्रशच्या लग्नात येतो आणि पुढे जे झालं ते पाहुन तुम्हाला देखील धक्काचं बसेल. 



क्रशच्या लग्नत एन्ट्री केल्यानंतर तो नवऱ्या मुलाला ढकलतो आणि नवरी मुलीला वरमाला घालून सिंदूर भरतो... सर्व घडल्या प्रकरणानंतर नवरीसोबतचं जमलेल्या पाहुण्यांना देखील मोठा धक्का बसला.