`हाउ टू ट्रेन यूअर ड्रॅगन` होणार तीन भाषांमध्ये प्रदर्शित
`हाउ टू ट्रेन यूअर ड्रॅगन: द हिडेन वर्ल्ड` भारतात इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये झळकणार आहे.
मुंबई : हॉलिवूड सीरिज 'हाउ टू ट्रेन यूअर ड्रॅगन: द हिडेन वर्ल्ड' भारतात 21 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अभिनेता अक्षय कुमारचा 'केसरी' सिनेमा सुद्धा प्रदर्शित होणार आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार 'हाउ टू ट्रेन यूअर ड्रॅगन..' सीरिजचा तीसरा भाग असणारा 'हाउ टू ट्रेन यूअर ड्रॅगन: द हिडेन वर्ल्ड' भारतात इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी आणि तेलगू अशा तीन भाषांमध्ये झळकणार आहे. भारतात हा सिनेमा एकूण 1000 सिनेमागृहात दाखल होणार आहे. 'यूनिवर्सल पिक्चर्स इंटरनेशनल' आणि 'ड्रीमवर्क्स एनीमेशनच्या खाली सिनेमा तयार झाला आहे.
सीरिज मध्ये किशोर विकिंग आणि एका भयानक फ्यूरी ड्रॅगन यांच्यात अचानक झालेल्या मैत्रीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन सिनेमाची अधिकृत घोषणा केली आहे.
सीरिजचे दिग्दर्शक डीन डेब्लॉइस यांनी 'हाउ टू ट्रेन यूअर ड्रॅगन: द हिडेन वर्ल्ड' सीरिजच्या माध्यमातून पुन्हा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सीरिज मध्ये जय बारूशेल, अमेरिका फेरेरा, केट ब्लेंकेट आणि किट हैरिंगटन यांच्या आवाजात चित्रित करण्यात येणार आहे. 'केसरी' आणि 'हाउ टू ट्रेन यूअर ड्रॅगन: द हिडेन वर्ल्ड' 21 मार्चला एकमेकांना टक्कर देणार आहेत. तर या दोन सिनेमांपैकी कोणता सिनेमा बॉक्स ऑफिसरवर बाजी मारेल हे
पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.