मुंबई : डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा द राइज'ची क्रेझ आजही सोशल मीडियावर कायम आहे. अल्लू अर्जुनची स्टाईल आणि डायलॉगपासून ते श्रीवल्लीच्या परफॉर्मन्सपर्यंत आणि सामंथा रुथ प्रभूच्या मनमोहक डान्सपर्यंत सगळ्याच गोष्टीने सोशल मीडियावर दबदबा निर्माण केला. साऊथ सिनेसृष्टीत बोलबाला केल्यानंतर बॉलीवूडमध्येही पुष्पाने चांगलाच धुमाकूळ घातला. सोशल मीडियावरही प्रत्येकजण पुष्पाची स्टाईल कॉपी  करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोठ-मोठ्या सेलिब्रिटींनी पुष्पाचे डायलॉग्स आणि डान्स स्टेप्सची कॉपी केली. अशा परिस्थितीत, चाहत्यांना पुष्पाविषयी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. म्हणूनच आम्ही अल्लू अर्जुन सेटवर पुष्पा म्हणून कसा वावरत होता. हे तुम्हाला आज सांगणार आहोतं. पुष्पाची बेधडक स्टाईल जाणून घेण्यासाठी वाचा आमचा हा खास रिपोर्ट.


रश्मिका मंदान्नाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत स्वतःच्या आणि अल्लू अर्जुनच्या नात्याबद्दल सांगितलं आहे. पुष्पा राज आणि त्यांची मैत्री आयुष्यभर टिकावी अशी श्रीवल्लीची इच्छा आहे. मुलाखतीत तिला अल्लू अर्जुनचा सेटवरचा दृष्टिकोन कसा होता. असं विचारण्यात आलं, यावर रश्मिकाने उत्तर देत सांगितलं की, अल्लू अर्जुन जसा सर्वांसमोर गोड आणि शांत स्वभावाचा आहे. तसाच तो सेटवरही असायचा. 


रश्मिका पुढे म्हणाली, त्याचा स्वभाव  खूप गोड आहे, तो खूप हळव्या मनाची व्यक्ती आहे. मला वाटतं एखादी व्यक्ती इतकी सरळ कशी असू शकते. मी त्याला म्हणायचे की, तू इतका सरळ का आहेस, तू इतका चांगला का आहेस... इतका चांगला राहू नकोस...


ती एक रत्न व्यक्ती आहे. तो खूप वर्षे मेहनत करतोय... मी त्याला माझ्या कॉलेजच्या दिवसांपासून पाहिलंय... तो स्टार आहे. मला स्वतःला वाटत होतं की, मी त्याला स्टारसारखं वागवलं पाहिजे. मी खूप भाग्यवान आहे की मला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली.''  पुष्पा: द राइजच्या चर्चा आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत.


या चित्रपटाच्या यशाचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, फक्त हिंदी जगतात या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर या चित्रपटाने 300 कोटींहून अधिक व्यवसाय केला आहे.