मुंबई : आता लवकरच होळीचा उत्साह सगळीकडे पाहायला मिळणार आहे. रंगपंचमीच्या या सणाला काही दिवस उरले आहेत, त्यामुळे सर्वजण आपापल्या परीने तयारी करत आहेत. कोणी रंग खरेदी करत आहेत तर कोणी स्वादिष्ट पदार्थ बनवण्याच्या तयारीत आहेत. आता होळी हा मजामस्ती आणि धमाल करण्याचा सण आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तुमचे आवडते स्टार होळी कशी साजरी करतात याबाबत जाणून घेण्यात त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात.


सहसा काहींना होळीच्या दिवशी सुट्टी घेऊन होळी खेळणे आवडते, तर काहींना होळीच्या दिवशी घरी राहून विश्रांती करायला आवडतं.


मात्र चित्रपट निर्माते अनुराग बसू या दिवशी शुटींग करणं पसंत करतात. अनुराग बसू यांच्या मते, होळीच्या दिवशी ते कोणताही चित्रपट शूट करतात, तो सिनेमा हिट होतो, म्हणून आता ते होळीच्या दिवशी काम करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर सेटवरच जोरदार होळी खेळतात.


रिअॅलिटी शोमध्ये प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार्‍या गीता कपूरला होळी आवडत नाही, त्यामुळे ती कधीच होळी खेळत नाही, ती होळीच्या दिवशी घरीच राहणे पसंत करते. ती आतापर्यंत एकदाच होळी खेळली आहे असं समोर आलं आहे.


दंगल फेम अभिनेत्री फातिमा सना शेखला होळी खेळायला आवडते आणि ती लहानपणापासूनच होळीमध्ये खूप धमाल करते. एकदा असे झाले की कोणीतरी तिला ग्रीस लावले. पण त्यानंतरही ती होळी खेळायला बाहेर पडते.


पुष्पा सिनेमामुळे सध्या सतत चर्चेत असलेला अल्लू अर्जुन याचा होळी हा आवडता सण आहे. दरवर्षी तो आपल्या बंगल्यावर कुटुंबासोबत होळीचा सण साजरा करतो.