Hrithik Roshan and Saba Azad : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हे दोघे बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट होतात. सबा आणि हृतिक हे अनेकदा पार्ट्यांमध्ये किंवा डिनर डेट किंवा मग लंचवर गेल्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. ते दोघे जिथे असतात तिथे सगळ्याचे लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतात. हृतिक आणि सबा यांच्या लग्नाची चर्चा त्यांच्या रिलेशनशिपविषयी कळल्यापासून सुरु होती. आता ते दोघं त्यांच्या नात्याला एक नाव देण्यासाठी तयार झाल्याचे म्हटले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिकने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर काहीच दिवसांत त्याच्या नव्या अफेअरची चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाल्यावर आता त्यांच्या लग्नासाठी चाहते उत्सुक आहेत. आता मीडिया रीपोर्ट्सनुसार हे जोडपं लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. हृतिकनेही सबाबरोबर लग्न करण्यासाठी होकार दिला असं म्हटलं जात आहे. मात्र, हे दोघे कधी आणि कुठे लग्न करणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.



रिपोर्ट्सनुसार, सबा आझाद आणि हृतिकची भेट एका कॉमेन फ्रेंड द्वारे झाली होती. त्या भेटीनंतर त्यांच्यात बोलणं होऊ लागलं होतं. खरंतर, हृतिक आणि सबाच्या रिलेशनशिपच्या चर्चा तेव्हा सुरु झाल्या जेव्हा त्या दोघांना एकत्र डिनर डेटवर स्पॉट केले होते. सुरुवातीला ते दोघे गोव्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी एकत्र अनेक ट्रीप केल्या. त्या दोघांच्या ट्रिप्सचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसता. करणच्या 50 व्य बर्थ डे पार्टीतील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. 


हेही वाचा : कोण म्हणतं Ranveer Singh आउटसाइडर? तो आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा नातू


हृतिक रोशन आणि सुझान खान यांचा 2014 साली घटस्फोट झाला. त्यानंतर हृतिकचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले होते. सबा आधी हृतिकचं नाव मॉडल सामंथा लॉकवुडसोबत जोडण्यात आले होते. त्याचे कारण हृतिक आणि सामंथाला एकत्र स्पॉट करण्यात आले होते. मग काय तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. सबा विषयी बोलायचे झाले तर 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल कबड्डी' नं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पण 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मुझसे फ्रैंडशिप करोगे' नं तिला लोकप्रियता मिळाला होती.