मुंबई : काही दिवसांपूर्वीच यशराज फिल्म्सने त्यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टबाबत घोषणा केली आहे. यशराजच्या या प्रोजेक्टमध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचं नाव चर्चेत आहे.


2 डान्सर एकत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रोजेक्टमध्ये हृतिक आणि टायगर एक सोबत काम करतांना दिसणार आहेत. वाणी कपूरतं नाव देखील या सिनेमासाठी चर्चेत आहे. सिनेमामध्ये हृतिकसोबत रोमांस करतांना दिसणार आहे. सिनेमामध्ये हृतिक हा टायगरचा गुरु दाखवण्यात येणार आहे. हृतिक टायगरची मदत करतांना दिसणार आहे. सिनेमाची कथा गुरु आणि शिष्यच्या आधारावर असणार आहे. यासाठी दोघे मिळून जबरदस्त डान्स आणि अॅक्शन या सिनेमामध्ये दाखवणार आहेत.


हिट अॅक्शन सिनेमा


सिनेमामध्ये या दोघांच्या मध्ये विलन देखील असणार आहे. ज्याच्यासाठी अजून शोध सुरु आहे. सिनेमाची रिलीज डेट देखील जवळपास निश्चित झाली आहे. 2 ऑक्टोबर 2019 ला सिनेमा रिलीज होणार आहे. पुढच्या वर्षी गांधी जयंतीच्या मुहुर्तावर सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत. हा आतापर्यंतचा सर्वात हिट अॅक्शन सिनेमा असणार असल्याची चर्चा आहे.