हृतिक रोशनच्या एक्स पत्नीला `कोई मिल गया`? या व्यक्तीला मानते `सर्वस्व`
ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान घटस्फोटानंतर कायम चर्चेत असते.
मुंबई : ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान घटस्फोटानंतर चर्चेत असते. काही वेळापुर्वी अफवा होती की, सुजैन खान घटस्फोटानंतर अली गोनीच्या भावाला अरसलान गोनीला डेट करत आहे. मात्र वेळेसोबत ही अफवा ठंड पडली. आता अरसलानने ज्या अंदाजात सुजैन खानला बर्थडे विश केलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा अफवा उठायला सुरुवात झाल्या आहेत.
खास बर्थडे विश
बॉलिवूडचा सुपरस्टार ऋतिक रोशनची एक्स पत्नी सुजैन खान आज आपला ४३वा वाढदिवस साजरा करतेय. पेशाने इंटिरीयर डिझाईनर सुजैन खान आपल्या पर्सनल आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. वाढदिवसाच्या निमीत्ताने तिला एका व्यक्तीने खास अंदाजात विश केलंय, ज्यामुळे सोशल मीडियावर अफवांचा बाजार उठलाय
अरसलान सुजैनला म्हणाला डार्लिंग
बिग बॉस फेम अली गोनीचा भाऊ अरसलान गोनीने आपल्या इंस्टाग्राम हैंडलवर सुजैनसोबत एक फोटो शेअर केला आणि वेगळ्या अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अरसलान आणि सुजैनच्या डेटिंगच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत. दोघांच्या रिलेशनशिपच्या अफवादेखील अनेकदा उठल्या आहेत. मात्र अरसलानच्या वाढदिवसाच्या शुभेच्छानंतर दोघांच्या रिलेशनशिपवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
व्हायरल होतेय सुजैनची कमेंट
अरसलानने फोटो पोस्ट करत लिहीलं की, 'हॅप्पी बर्थडे डार्लिंग मी प्रार्थना करतो की, हे नवं वर्ष तुझं छान जावो आणि तुझ्या आयुष्य खुशहाल राहो' अर्सनालच्या या पोस्टने तिच्या नात्याच्या चर्चेला आणखी हवा मिळाली आहे. इतकंच नाही तर सुझान खाननेही या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, 'माझ्यासाठी सर्वकाही असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद'.