Sussanne Khan Reviews Fighter : आज भारतात 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत गुरुवारी 25 जानेवारीला बहुचर्चित फायटर हा चित्रपट प्रदर्शित झाला. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला फायटर हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता हृतिक रोशनची पहिली पत्नी सुझान खानने हा चित्रपट कसा आहे, याची माहिती दिली आहे. तिने याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फायटर हा चित्रपट गुरुवारी 25 जानेवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे फायटर या चित्रपटाचे कौतुक करताना दिसत आहेत. त्यात आता ऋतिकची पहिली पत्नी सुझान खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. तिच्या या स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. 



सुझान खान काय म्हणाली?


सुझान खानने फायटर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे. त्यात तिने दीपिका पदुकोण, ऋतिक रोशन या टॅग करत तिला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितले आहे. खूप खूप अभिनंदन. खूपच सुंदर आणि मोठा चित्रपट, असे सुझान खानने म्हटले आहे.  सुझानने हृतिक रोशनचा फायटर चित्रपट तिचा मुलगा ऋदान आणि रेहान यांच्यासोबत पाहिला होता. त्यानंतरच तिने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली. सध्या तिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. 



पहिल्या दिवशी केली इतकी कमाई


दरम्यान ‘फायटर’ हा चित्रपट देशभक्तीवर आधारित आहे. २०१९ मध्ये काश्मीरमध्ये झालेला पुलवामा हल्ला व त्यानंतर भारतीय हवाई दलाकडून करण्यात आलेला एअर स्ट्राइक याचे संदर्भ चित्रपटात आहेत. या चित्रपटात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण हे प्रमुख भूमिकेत आहेत. त्याबरोबरच या चित्रपटात करण सिंग ग्रोव्हर, अक्षय ओबेरॉय, तलत अजीज यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात 22 कोटींचा गल्ला जमवला होता. तर या चित्रपटाने जगभरात 50 कोटींहून अधिकची कमाई केली होती. आता हा चित्रपट किती कमाई करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे