मुंबई : अभिनेता हृतिक रोशनची लव्ह लाईफ चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता काही दिवसांपूर्वी एका मुलीचा हात धरुन रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसला. त्यानंतर ही मिस्ट्री गर्ल कोण आहे असा प्रश्न अनेकांना पडला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर ही मुलगी एक अभिनेत्री असल्याचं समोर आलं. तिचं नाव सबा आझाद असल्याचं कळताच तिच्या फॉलोवर्समध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मिस्ट्री गर्लचा खुलासा झाल्यानंतर दोघे पुन्हा एकत्र दिसले आणि डेटींगच्या बातम्यांनी जोर धरला. 


 दरम्यान, आता लहृतिकची माजी पत्नी सुजैन खानने सबाच्या परफॉर्मन्सचं कौतुक केले आहे


इंस्टाग्राम स्टोरीवर सुजैनने सबा आझादच्या गायनाचे कौतुक केले आहे. तिने लिहिले 'किती छान संध्याकाळ होती. सबा आझाद तुम्ही सुपर कूल आणि सुपर टॅलेंटेड आहात. सुजैनचे हे म्हणणे हे सबाचे मोठे कौतुक आहे. सबाने तिची पोस्ट पुन्हा शेअर करताना सुजैनचे आभार मानले आहेत. तिने लिहिले, 'धन्यवाद माझी सुझी, काल रात्री तू तिथे होतीस याचा मला आनंद आहे.'


सुजैनची ही पोस्ट सबासोबतच्या तिच्या चांगल्या नात्याचा इशाराही देत आहे. तसे, सबा आणि हृतिक खरोखरच एकमेकांना डेट करत आहेत की नाही, याबाबत अजूनही शंका आहे. अलीकडेच सबाला या संदर्भात प्रश्न विचारला असता तिने ते याबाबत बोलणं टाळलं आहे. काही रिपोर्ट्सनुसार, हृतिक आणि सबा काही प्रोजेक्टमध्ये एकत्र काम करत आहेत.


हृतिकच्या रिलेशनशीपबाबत सुजैन काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्यामुळे सुजैनची ही पोस्ट अनेकांना चकीत करणारी ठरत आहे. 



बातमीनुसार, हृतिक आणि सबाची भेट त्यांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. सबा एक अभिनेत्री आणि गायिका आहे. नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा इमाद शाह याच्यासोबत तिने अनेक गायन सादर केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, सबा आणि इमाद लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघेही सात वर्षे एकमेकांना डेट करत आहेत.