हृतिक रोशनची EX-Wife सुझैन खान अडकणार लग्न बंधनात?
हृतिक आणि सुझैनचा 2013 साली घटस्फोट झाला आहे.
मुंबई : बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन खान (Sussanne Khan) आजकाल अर्सलन गोनीसोबतच्या (Arslan Goni) तिच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे. सुझैन आणि अर्सलन अनेकदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. अलीकडेच, हे लव्हबर्ड्स सुट्टीसाठी फिरायला एकत्र गेले होते, त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. दोन मुलांची आई असलेली सुझैन खान हृतिक रोशनसोबत मॉडर्न पॅरेंटिंगद्वारे मुलांचे संगोपन करत आहे. हृतिक आणि सुझैन एकमेकांना खूप सपोर्ट करतात, कंगना रणौतसोबतच्या कायदेशीर लढाईतही सुझैनने हृतिकला खूप चांगली साथ दिली.
नुकत्याच सुरु असेलल्या चर्चांनुसार, हृतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझैन लवकरच तिचा बॉयफ्रेंड अर्सलन गोनीसोबत लग्न बंधनात अडकणार आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'सुझैन आणि अर्सलन Mature आहेत आणि त्यांना माहित आहे की त्यांना त्यांचे उर्वरित आयुष्य एकत्र घालवायचे असून त्यांना लग्न करायचे आहे. सुझैननेही दुसऱ्यांदा लग्न करण्याचा गंभीरपणे विचार केला आहे. जर दोघांनीही लग्न केले तर मग ते अगदी साध्या पद्धतीने होईल. कोणताही मोठ्या प्रकारे सेलेब्रेशन होणार नाही.'
सुझैन आणि अर्सलनच्या लग्नाआधी हृतिक आणि सबा आझादच्या लग्नाची चर्चाही जोरात होती. सूत्राने पुढे सांगितले की, 'हृतिक रोशन त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत लग्न करणार असल्याची चर्चा होती, परंतु अद्याप या जोडप्याने लग्न करणार असल्याच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. पण हे निश्चित आहे की सुझैन तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करणार, परंतु आता तारीख सांगणे कठीण आहे.
2013 मध्ये हृतिक आणि सुझैनचा घटस्फोट झाला
2000 मध्ये हृतिक आणि सुझैनचे लग्न झाले. या दोघांची जोडी ही चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. 2013 मध्ये हृतिक आणि सुझैनचा घटस्फोट झाला. मात्र, विभक्त होऊनही दोघांनी रेहान आणि रिदान या मुलांना एकत्र वाढवले.