मुंबई : सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा बऱ्याचदा चाहत्यांना असते. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या आयुष्यात खास व्यक्ती कोण आहे? याबाबत चाहत्यांना जाणून घ्यायचं असतं. पण आता बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा रंगत आहे, ती अभिनेता हृतिक रोशनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घटस्फोटानंतर हृतिकच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे हृतिकला त्या खास व्यक्तीसोबत काही दिवसांपूर्वी पहिल्यांदाच स्पॉट करण्यात आलं आहे. 


हृतिक रोशन पुन्हा एकदा गर्लफ्रेंडसोबत दिसताच सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओमध्ये हृतिक रोशन त्याची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री सबा आझादसोबत हातात हात घालून हॉटेल बाहेर पडल्याचं दिसत आहे. 



त्यात आता हृतिक रोशनचा गर्लफ्रेंडसोबतचा हॉटेलमधील एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात सबा आझाद हृतिकसोबत मेन्यू कार्ड घेऊन मजामस्ती करताना दिसत आहे. या व्हिडिओत दोघांची बॉण्डिंग दिसून येत आहे.


सबा हृतिकसोबत डिनर डेटवर गेली असतानाचा हा व्हिडिओ आहे. सबाने हृतिकला हाय-फाय देत आज डिनरचा मेन्यू काय असेल? हे ठरवत असल्याचं दिसून येत आहे. दोघेही सध्या एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करत आहेत.