मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन सध्या 'विक्रम वेधा' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच त्याने चित्रपटाचे अनेक अ‍ॅक्शन सीन पूर्ण केले आहेत. चित्रपटाच्या अ‍ॅक्शन टीमने प्रभावित होऊन हृतिकने त्यांना एक खास भेटही दिली आहे. हृतिक त्याच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना नेहमी आनंदी ठेवतो. हृतिकची इच्छा आहे की त्यांचे क्रू नेहमीच आनंदी असावेत आणि त्यांच्या कामाचे कौतुक व्हावे. त्यामुळेच त्यांनी टीममधील लोकांना कौतुक म्हणून भेट दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिक रोशनने या चित्रपटाचा अ‍ॅक्शन सीक्वेन्स अबुधाबी, संयुक्त अरब अमिरात येथे पूर्ण केला, जो चांगला गेला. त्यानंतर हृतिकने टीममधील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला.


बातम्यांनुसार, हृतिकने 'विक्रम वेधा'च्या अ‍ॅक्शन टीमच्या प्रत्येक सदस्याला शूजची जोडी भेट दिली आहे.


हे काही पहिल्यांदाच घडलेले नाही. आपल्या टीममध्ये काम करणाऱ्या लोकांना आनंदी ठेवण्यासाठी हृतिक नेहमीच भेटवस्तू देतो. 'वॉर' आणि 'सुपर 30' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याने आपल्या टीमला खास भेटवस्तूही दिल्या होत्या. हृतिकची ही शैली त्याच्या टीममधील लोकांना खूप आवडते. हे गिफ्ट देऊन हृतिकने खऱ्या अर्थाने लोकांमध्ये आनंदही वाटून घेतला आहे.