नवी दिल्ली : बॉलिवूडमधील सर्वात हँडसम अभिनेत्यांमध्ये हृतिक रोशनचं नाव अगदी वरच्या स्थानी आहे. हृतिकने त्याचं व्यक्तीमत्व, डान्स, अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही आपलं नाव कायम राखलं आहे. ग्रीक गॉड या नावाने प्रसिद्ध असलेल्या हृतिकने आपल्या पहिल्याच चित्रपटात जबरदस्त कमाल करत चाहत्यांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला कहो ना प्यार है चित्रपटाने हृतिकच्या त्यानंतर आलेल्या अनेक चित्रपटांना मागे टाकलं. कहो ना प्यार है चित्रपटाने जवळपास 92 अवॉर्ड आपल्या नावे केले आहेत. आणि त्यासोबतच सर्वाधिक अवॉर्ड जिंकणाऱ्या पुरस्कारांमध्ये कहो ना प्यार है चित्रपट पहिल्या क्रमांकावर आहे. कहो ना प्यार है चित्रपटाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वाधिक अवॉर्ड जिंकणारा चित्रपट म्हणून नोंद करण्यात आली आहे.



या चित्रपटासाठी राकेश रोशन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वात्कृष्ट निर्मात्याचा अवॉर्ड मिळाला. तर हृतिकला पदार्पणातील (Debut Actor) सर्वात्कृष्ट अभिनेत्याचा अवॉर्ड मिळाला.


द कपिल शर्मा शो दरम्यान हृतिकने कहो ना प्यार है चित्रपटानंतरचा एका किस्साही शेअर केला होता. हृतिकने कहो ना प्यार है चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास 30 हजारांहून अधिक मॅरेज प्रपोजल आले असल्याचं सांगितलं होतं. चित्रपटातील गाणी, संगीत, कथानक, कलाकारांचे अभिनय या सर्वच बाबींनी चित्रपटाला उचलून धरत, चित्रपट एका वेगळ्याच उंचीवर पोहोचावला होता. आजही कहो ना प्यार है चित्रपट, त्यातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीत आहेत.