मुंबई : बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. ऋतिक सध्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Veda) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. विक्रमच्या ट्रेलरला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली आहे. मुळ तामिळमध्ये असलेल्या या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. नुकतंच चित्रपटातील ‘अल्कोहोलिया’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात ऋतिक अप्रतिम डान्स करताना दिसत आहे. मुंबईतील आयकॉनिक सिंगल-स्क्रीन थिएटर कॉम्प्लेक्स, गेटी-गॅलेक्सी येथे गाण्याला लॉन्च करण्यात आले. यावेळी ऋतिकनं एक धक्कादायक खुलासा केला आहे. 


आणखी वाचा : शाहरुखची पत्नी गौरीचा हा Video होतोय Viral, हॉटनेसमध्ये लेक सुहानालाही टाकले मागे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी ऋतिकनं 22 वर्षांपूर्वीचा एक किस्सा सांगितला. 22 वर्षांपूर्वी ‘कहो ना प्यार है’ प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी पहिल्या दिवसाच्या पहिल्या शोसाठी इथे आलो होतो. जेव्हा चित्रपट संपला आणि लाइट चालू झाल्या तेव्हा प्रेक्षकांनी मला ओळखले. त्यादिवशी मी स्वतः प्रेक्षकांचं प्रेम अनुभवलं होते. 


आणखी वाचा : Sunny Leone 'या' व्यक्तीसोबत गेली Vacation वर, बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा :  वयाने 25 वर्षे लहान असलेल्या अभिनेत्रीसोबत रोमान्स करताना दिसले नागार्जुन, Actress नं स्वत: शेअर केले फोटो


ऋतिक या चित्रपटाआधी डॉक्टरांनी दिलेला एक अनुभव सांगताना म्हणाला, 'मला अजून आठवतंय कहो ना प्यार है प्रदर्शित होण्यापूर्वी डॉक्टरांनी मला सांगितलं होतं की माझी तब्येत तितकीशी चांगली नसल्यानं मी चित्रपटांमध्ये अॅक्शन आणि डान्स करू शकणार नाही. मी ते आव्हान म्हणून स्वीकारले. मी माझ्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेतली. माझ्या 25 व्या चित्रपटात मी अजूनही अॅक्शन, डान्स आणि ते डायलॉग बोलू शकतोहे काही चमत्कारापेक्षा कमी नाही. 21 वर्षाच्या माझ्या व्हर्जनला नक्कीच माझा अभिमान वाटत असेल.' (Hrithik Roshan says doctor s told him before his debut he can not do action films and dance )


आणखी वाचा : गौरीनं सोडली शाहरुखची साथ; तब्बल 17 वर्षांनंतर अखेर त्याच्या दारी गेली King Khan ची पत्नी


‘विक्रम वेधा’ च्या तामिळ चित्रपटात आर माधवन आणि विजय सेतुपती यांच्यातली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली. 'विक्रम वेधा' या चित्रपटाच्या हिंदी रिमेकची चाहते प्रतिक्षा करत आहेत. या चित्रपटात आपल्याला ऋतिकसोबत सैफ अली खान (Saif Ali Khan) दिसणार आहे. गुलशन कुमार, टी-सीरिज, रिलायन्स एन्टरटेन्मेंट, फ्रायडे फिल्मवर्क्स, जिओ स्टुडिओ आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनच्या या सगळ्यांच्या वतीनं 'विक्रम वेधा' हा चित्रपट प्रस्तुत केला जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, निर्मिती भूषण कुमार आणि एस. शशिकांत यांनी केली आहे. 30 सप्टेंबर 2022 रोजी ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.