मुंबई : मुंबईत दादासाहेब फाळके पुरस्कार २०२०ची घोषणा झाली आहे. (Dada Saheb Phalke Foundation Awards 2020) या पुरस्कार सोहळ्यासाठी लवकरच एका भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी यावर्षी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने 'सुपर ३०' (Super 30) चित्रपटातील त्याच्या जबरदस्त भूमिकेसाठी सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड लाईफ डॉट कॉमने दिेलेल्या वृत्तानुसार, सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी 'सुपर ३०'ला पुरस्कार जाहीर झाला आहे. 'सुपर ३०'मध्ये अभिनेता हृतिक रोशनने बिहारमधल्या आनंद कुमार या शिक्षकाची भूमिका साकारली होती. या बायोपिकमध्ये हृतिकसोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरने स्क्रिन शेअर केली होती. 


पाहा दादासाहेब फाळके पुरस्कारांची यादी -


सुपर ३० सर्वोत्कृष्ट अभिनेता - हृतिक रोशन
मोस्ट प्रोमिसिंग अभिनेता - किच्चा सुदीप
बेस्ट एक्टर इन टेलीव्हिजन सीरिज - धीरज धूपर
बेस्ट एक्ट्रेस इन टेलीव्हिजन - दिव्यांका त्रिपाठी
मोस्ट फेव्हरेट टेलीव्हिजन एक्टर - हर्षद चोपडा
मोस्ट फेव्हरेट जोडी इन टेलीव्हिजन सीरीज - सृष्टी झा आणि शब्बीर अहलूवालिया (कुमकुम भाग्या)
बेस्ट रियालिटी शो - बिग बॉस १३
बेस्ट टेलीव्हिजन सीरिज - कुमकुम भाग्या
बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल - अरमान मल्लिक
मोस्ट फॅशनेबल बिग बॉस १३ कंटेस्टेंट - माहिरा शर्मा
बेस्ट एक्ट्रेस वेब सीरीज - दीया मिर्जा (काफिर)
बेस्ट ऍन्कर - मनीष पॉल
बेस्ट डिजिटल फिल्म - योर्स ट्रूली
डेकेड स्टार २०२० - अनुपम खेर
बेस्ट पापराजी ऑफ द ईअर - मानव मंगलानी


गेल्या वर्षी बॉलिवूड शहंशाह अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. चित्रपटसृष्टीतील पुरस्कारांमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार अतिशय मानाचा पुरस्कार मानला जातो. भारत सरकारकडून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात १९६९ मध्ये झाली होती. पहिल्यांदा हा पुरस्कार अभिनेत्री देविका रानी यांना सर्वोत्तम अभिनयासाठी बहाल करण्यात आला होता.