मुंबई : सुपरस्टार हृतिक रोशन आणि सुझैन खान घटस्फोटानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात पुढे गेले आहेत. मात्र दोघंही मुलांसाठी एकत्र कुटुंबासाठी वेळ घालवताना दिसतात. त्याचबरोबर, आता सुझान खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. जो पाहून लोकांना चांगलाच धक्का बसला आहे. सुझानचा हा व्हिडिओ पापाराझींनी तिला स्पॉट करताना शूट केला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पार्टीनंतर व्हिडिओ समोर
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पार्टीनंतर सुझान तिच्या मित्रांसोबत स्पॉट झाली होती. यादरम्यान, तिच्या कारमध्ये जाण्याआधी, ती सगळ्यांना सी ऑफ करते. पण ज्या पद्धतीने सुझान आणि अर्सलानने एकमेकां  गुड बाय करतात ते खूप खास आहे. या दोघांची जवळीकताही खूप काही सांगून जाते.


कॅमेऱ्यासमोर केलं किस
यादरम्यान सुझान आणि अर्सलान कॅमेऱ्याची पर्वा न करता एकमेकांना मिठी मारुन किस करताना दिसतात. जेव्हा अर्सलानने तिला कारमध्ये बसवतो आणि कार पुढे जाते  तेव्हाही सुझान त्याला फ्लाईंग किस देते.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कोण आहे अर्सलान गोनी
अर्सलान हा 'बिग बॉस 14' चा स्पर्धक अली गोनीचा भाऊ आहे. अर्सलानने काही दिवसांपूर्वी अल्ट बालाजीची वेब सीरिज 'मैं हिरो बोल रहा हूँ' साइन केली आहे. रिपोर्ट्सनुसार, 42 वर्षीय सुझान गेल्या एक वर्षापासून अर्सलानला ओळखत होती. टीव्ही इंडस्ट्रीशी संबंधित एका कॉमन फ्रेंडद्वारे दोघांची पहिली भेट झाली.