मुंबई : चाहत्यांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर बॉलिवूडचे 'ग्रीक गॉड' नावाने ओळखल्या जाणारे प्रसिद्ध अभिनेते हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ एकत्र रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. 'वॉर' चित्रपटाच्या माध्यमातून हे कलाकार एकत्र स्क्रिन शेअर करताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे. नुकताच चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. अॅक्शनने परिपूर्ण असलेल्या चित्रपटाची कथा अद्यापही गुलदस्त्यात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नुकताच प्रदर्शित करण्यात आलेल्या 'वॉर' चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ५२ मिनिटांच्या या टीझरमध्ये हृतिक - टायगर यांच्या हॉलिवूड अॅक्शनचा प्रत्येय चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच एकूण ४८ हजारांपेक्षा जास्त चाहत्यांनी पाहिला आहे.


अॅक्शनने परिपूर्ण असलेल्या 'वॉर' चित्रपटात वाणी कपूर देखील भूमिका साकारताना दिसणार आहे. 'वॉर' २ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सिद्धार्थ आनंद यांच्या खांद्यावर आहे.