मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन त्याच्या हटके स्टाईलिंगमुळे नेहमीच चर्चेत असतो. बॉलिवूड फॅक्शन आयकॉन म्हणून हृतिकची एक वेगळी ओळख आहे.नुकतच हृतिकने कूल अंदाजातील फोटो शेअर केरत अभिनेत्री कियारा आडवाणीला एक प्रश्न विचारला आहे. हृतिकने केलेलं हे ट्विट सध्या चांगलच व्हायरल होत आहे. फोटो शेअर करत त्याने  कियाराला टॅग देखील केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिकने कॅप्शन लिहिलंय, "कियारा, तुला वाटते की हे बरोबर दिसत आहे?"हृतिकच्या या पोस्टवर चाहत्यांनी आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.अनेकांना हृतिक आणि कियारा लवकरच एकत्र सिनेमा  करणार आहेत का? असा प्रश्न पडला. 



संपूर्ण गोष्ट आली समोर 


पण त्यानंतर सगळ्यांना हे स्पष्ट झालं की, हृतिक आणि कियारा यांनी ई-कॉमर्स वेबसाईटसाठी खास फोटोशूट केलं आहे. आणि या फोटोशूटसाठी केलेला लूक कसा दिसतो आहे ? असा प्रश्न हृतिकने कियाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारला आहे.


हृतिक, कियारा व्यतिरिक्त या पेजने विजय देवरकोंडा, समानता प्रभु आणि दुल्कर सलमान यांची भारतातील फॅशन आयकॉन म्हणून निवड केली आहे.



या सिनेमात दिसणार हृतिक आणि कियारा 


हृतिक रोशन 'फाइटर' या सिनेमात दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे. याशिवाय, तो 'विक्रम वेध'चा रिमेक आणि 'क्रिश 4' सारख्या प्रोजेक्ट्सवर देखील काम करत आहे. तर कियारा आता 'शेरशाह' , 'भूल भूलै 2' आणि 'जुग जुग जियो' मध्ये दिसणार आहे.