मुंबई : अभिनेता हृतिक रोशनने बॉलिवूडमध्ये फक्त आपल्या अभिनयाने नाही तर उत्तम डान्सने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज बॉलिवूडमध्ये अनेक हँडसम अभिनेते आहेत, पण चाहत्यांच्या मनात हृतिकसाठी ज्या भावना आहे, त्या दुसऱ्या अभिनेत्यांसाठी नाही.  आज मुलींच्या मनातील ताईत असलेल्या हृतिकचा वाढदिवस... त्याच्या खास दिनी त्याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेवू.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृतिकचा जन्म मुंबईच्या पंजाबी कुटुंबात झाला. हृतिक खरं आडनाव रोशन नसून नागरथ आहे. वयाच्या 6व्या वर्षी हृतिकने कामाला सुरूवात केली. आजोबा ओम प्रकाश यांच्या 'आशा' चित्रपटात हृतिकने डान्स केला. त्यासाठी हृतिकला 100 रूपये मानधन मिळालं होतं. 


त्यानंतर हृतिकने कधी मागे वळून पाहिलं नाही. 'आशा' चित्रपटानंतर त्याने 1986 साली प्रदर्शित झालेल्या 'भगवान दादा' चित्रपटात सुपरस्टार रजनीकांत यांच्या दत्तक मुलाची भूमिका साकारली. 



आता हृतिक इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्यांपैकी आहे. हृतिकने त्याच्या करियरची सुरूवात 'कहो ना प्यार है' चित्रपटाच्या माध्यमातून केली. त्यानंतर त्याने अभिनेय क्षेत्रात उत्तम कामगिरी केली. 


'कहो ना प्यार है' शिवाय हृतिकने 'मिशन कश्मीर', 'यादें', 'कभी कुशी कभी गम', 'मैं प्रेम की दीवानी हूं', 'कोई मिल गया', 'लक्ष्य', 'धूम 2', 'जोधा अकबर', 'गुजारिश', 'अग्निपथ', 'बैंग बैंग', 'काबिल',  'सुपर 30' आणि 'वॉर' चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकरली आहे.