मुंबई : 'कबीर सिंग' चित्रपट प्रदर्शित होताच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरला आहे. यंदाच्या वर्षीच्या 'अडल्ड' चित्रपचांच्या यादीत अव्वल स्थानी असलेल्या 'कबीर सिंग'च्या कमाईचा आकडा सलग चढत्या क्रमावर आहे. २१ जून रोजी रूपेरी पडद्यावर दाखल झालेल्या 'कबीर सिंग' चित्रपटामुळे शाहिदच्या करियरला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. चित्रपटाच्या सलग वाढत्या आकड्यामुळे शाहिदची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. पुढील चित्रपटासाठी शाहिद चक्क ३० कोटी रूपयांचे मानधन स्वीकारणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचबरोबर 'पद्मावत', 'सुलतान', 'संजू', 'बजरंगी भाईजान', 'टायगर जिंदा है' या एकापेक्षा एक चित्रपटांना देखील 'कबीर सिंग' चित्रपटाने मागे टाकले आहे. भारत देशात 'कबीर सिंग' एकूण ३ हजार १२३ चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. 'कबीर सिंग' चित्रपट २०१९ मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 


बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत असलेला हा चित्रपट लवकरच २५० कोटींचा टप्पा गाठेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 'अर्जुन रेड्डी' या तेलुगू चित्रपटाचा रिमेक असणाऱ्या 'कबीर सिंग'मध्ये शाहिद मध्यवर्ती भूमिकेत झळकत आहे. कियारा अडवाणी त्याच्यासोबत चित्रपटातून स्क्रीन शेअर करत आहे. प्रेमाची उध्वस्त कहाणी बॉक्स ऑफिसवर चांगलीच गाजत आहे.