मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सध्या अरमेनियामध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. तेथून हुमाने एक व्हि़डिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ ९८ हजार लोकांनी पाहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरमेनियाच्या रस्त्यांवर हुमासोबत एक मजेशीर गोष्ट घडली. ती घटना या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. व्हिडिओत हुमा अरमेनियाच्या रस्त्यांवर फिरत आहे. तेव्हा तिला तिथे एक स्ट्रीट म्युझिशन दिसतो. हुमा या स्ट्रीट म्युझिशनच्या धुनवर डान्स करु लागते. तेव्हा तिथे एक महिला येते आणि म्युझिशन समोर ठेवलेल्या बॅगेत पैसे ठेवून निघून जाते. पैसे ठेवताना हुमा त्या महिलेला वाकून अभिवादन करते. पण तिची पाठ फिरताच हुमाला हसू आवरत नाही. 


तुम्हीही पाहा हा व्हिडिओ...



लवकरच हुमा कुरेशी छोट्या पडद्यावर झळकेल. झी टीव्ही वरील 'इंडियाज बेस्ट ड्रामेबाज' हा रियालिटी शो जज करताना हुमा लवकच दिसेल.