Oo Antava गाण्याचा वापर करत भारती सिंग कमवतेय लाखो रुपये?
साउथ सुपरस्टार अल्लू अर्जनच्या `पुष्पा: द राइज` चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये स्वत:ची क्रेझ निर्माण केली आहे.
मुंबई : साउथ सुपरस्टार अल्लू अर्जनच्या 'पुष्पा: द राइज' या चित्रपटाने प्रेक्षकांमध्ये स्वत:ची क्रेझ निर्माण केली आहे. तर या चित्रपटातील समंथा रुथ प्रभूच्या आयटम सॉन्गने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हे गाणं चाहत्यांना इतकं आवडलं आहे की, त्यावर लाखो रील्स बनवण्यात येत आहेत. विशेष म्हणजे केवळ चाहतेच नाही तर टीव्हीपासून ते बॉलीवूड सेलिब्रिटीही समांथाच्या या गाण्यावर रील बनवत आहेत. ज्याला सोशल मीडियावरही चांगलीच पसंती मिळत आहे.
त्याचबरोबर आता या गाण्याची क्रेझ कॉमेडियन भारती सिंगवरही चढली आहे. रिअॅलिटी शो 'हुनरबाज'च्या सेटवरील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारती आणि शोचे जज मिथुन चक्रवर्ती यांनी 'ऊ अंतवा' गाणं वेगळ्या स्टाईलमध्ये रिक्रिएट केलं आहे.
खरंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारती सिंग तिच्या मोबाईलवर एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक मोबाईल क्लिप देखील वापरण्यात आली आहे. ज्यामध्ये भारती जज मिथुन चक्रवर्ती यांना छेडताना दिसत आहे. यादरम्यान बॅकग्राउंडमध्ये 'ऊ अंटावा'चं हिंदी व्हर्जन वाजत आहे. यादरम्यान भारतीचं वागणं पाहून मिथुन चक्रवर्तीही हैराण झाले आहेत.
मिथुन चक्रवर्तीसोबत भारतीची ही मस्ती पाहून परिणीतीही हसायला लागते. यानंतर भारती सिंह अचानक मिथुन चक्रवर्तीला छेडणं थांबवते आणि म्हणते, 'तुम्ही माझ्यासाठी पैसे कमवण्याचा एक मार्ग होतात. तुम्हाला एवढंच करायचं होतं. आता मी या व्हिडिओतून पैसे कमावणार आहे. यानंतर ती जजच्या पैशांच्या वाट्याबद्दल बोलते. या व्हिडिओमध्ये मिथुन चक्रवर्तीसोबत भारती सिंगची मस्ती शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्येही पाहायला मिळाली.
भारती सिंग लवकरच आई होणार आहे. अलीकडेच भारतीने तिची प्रेग्नेंसी अतिशय मजेशीर पद्धतीने जाहीर केली. त्यानंतर तिच्यावर अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला. मात्र, या दिवसांतही भारती कामाला पूर्ण वेळ देत असल्यानं तिचं खूप कौतुक होत आहे.