मुंबई : स्टँडअप कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंह गुरुवारी आई झाली. पती हर्ष लिंबाचियाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. तेव्हापासून या दोघांचं अभिनंदन त्यांचे चाहते करत आहे. हर्ष आणि भारती 'हुनरबाज: देश की शान' या रिएलिटी शोला एकत्र जज करत होते. पण आता भारतीला शोमधून ब्रेक घ्यावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीने घेतला कामातून ब्रेक
भारती देशातील पहिली होस्ट बनली आहे. जिने तिच्या संपूर्ण गर्भधारणेदरम्यान काम केलं आहे. प्रसूतीच्या एक दिवस आधी ती शो होस्ट करत होती. मात्र आई झाल्यानंतर ती आगामी काही काळ शोमध्ये दिसणार नाही. भारतीला तिच्या लहान मुलासोबत थोडा वेळ घालवायचा आहे आणि अशा परिस्थितीत तिने सध्या कामातून ब्रेक घेतला आहे.



ही एक्ट्रेस दिसू शकते
दरम्यान, 'हुनरबाज'मध्ये भारतीच्या जागी टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदना आता हर्षसोबत दिसणार असल्याचं बोललं जात आहे. सुरभी देखील टीव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव आणि चेहरा असल्याचं निर्मात्यांचं मत आहे. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना भारतीप्रमाणेच ती होस्ट म्हणूनही आवडेल. मात्र, सध्या या वृत्तांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.