मुंबई : देशातील कोणत्याच कोपऱ्यात आज मुली सुरक्षित नाहीत. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आजही वाऱ्यावर असल्याचं वास्तव हैदराबादच्या बलात्कार प्रकणावरून समोर येत आहे. २६ वर्षीय पशुवैद्यकीय डॉक्टर तरूणीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येमुळे देशात संतापाचे वातावरण आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. अभिनयात कमी पण सतत वादग्रस्त विधान करणारी पायल रोहतगीने हैदराबाद घटनेवर आक्षेपार्ह ट्विट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राम राम जी, मुस्लिम परिसात एका हिंदू मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आला आणि तिची हत्या करण्यात आली.' अशा आक्षेपार्ह ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. समाजाला उद्देशून केलेल्या ट्विटमुळे ती पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.  


या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळत आहे. त्या नराधमांना फाशी द्या, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सामुहिक बलात्काराप्रकरणी पोलिसांनी चारजणांना अटक केली आहे. यात दोन वाहनचालक आणि एक क्लीनर होता. मोहम्मद पाशा, नवीन, केशावुलु आणि शिवा अशी आरोपींची नावं आहेत.


२२ वर्षीय महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर रस्त्याच्या कडेलाच तिचा मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. यावरून असं सिद्ध होत आहे की देशात कोणत्याच भागात महिला सुरक्षित नाहीत.