मुंबई : झगमगत्या विश्वात ग्लॅमर, बोल्ड कपडे, बोल्ड अंदाज याबद्दल कायम चर्चा रंगलेली असते. पण  'जीजा जी छत पर है' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री हिबा नवाबने  (Hiba Nawab) नुकताचं तिच्या कपड्यांबद्दल मोठा खुलासा केला आहे.  ती म्हणते रिवीलिंग कपडे न घलण्याचा माझा स्वतःचा निर्णय आहे. 'जीजा जी छत पर है' मालिकेच्या माध्यमातून हिबाने सर्वांचं मन जिंकलं आहे. सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह राहणाऱ्या हिनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हिना कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. हिना तिच्या अभिनयासोबतचं तिच्या सौंदर्यामुळे देखील चर्चेत असते. कलाविश्वाचा महत्त्वाचा भाग असली तरी तिने आतापर्यंत कधीचं रिवीलिंग कपडे घातले नाहीत. खुद्द हिनानेच रिवीलिंग कपडे न घालण्याचं कारण सांगितलं. 



एका मुलाखतीत हिबा म्हणली, 'मी एका मुस्लीम कुटुंबातील आहे. आमच्या इथे संस्कृती वेगळी आहे.मी असंही माझ्या संस्कृतीचा विरोध करते. त्यामुळे या पुढे नाही जावू शकत. माझ्या कुटुंबातील सदस्यांना माझे कपडे आवडत नाहीत. त्यांना वाटतं  मी वेगळ्या अंदाजातील कपडे घालावे. '


पुढे हिबा म्हणाली, मला वेब सीरिजमध्ये काम करायचं आहे. पण बोल्ड सीन असल्यामुळे मी विचार करते. माझं कुटुंब मला फार पाठींबा देतात. काही गोष्ट न करण्याचा माझा स्वतःचा निर्णय आहे.' असं म्हणत हिबाने बोल्ड लूक बद्दल आपले विचार मांडले