मुंबई : आशा नेगी ही एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे जिने आता OTT च्या जगावर अधिराज्य गाजवलं आहे. मिस उत्तराखंड असलेल्या आशाला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचं होतं आणि तिचं हे स्वप्न देवाने पूर्ण केलं. मुंबईत आल्यानंतर आशा अभिनय शिकली. आणि कष्ट करून तिने नाव कमावलं. यासोबतच ती तिचा कोस्टार ऋत्विक धनजानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचंही सांगितलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोघांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केलं होतं आणि चाहते तिच्या लग्नाची वाट पाहत होते. त्यामुळे 2020 मध्ये जेव्हा त्यांच्या विभक्त होण्याची बातमी समोर आली तेव्हा सगळेच थक्क झाले. त्यांचं ब्रेकअप खूपच धक्कादायक होतं. आता एका मुलाखतीत आशाने तिच्या लव्ह लाईफवर विचारलेल्या प्रश्नांनाही दिलखुलास उत्तरे दिली.


मला कोणत्याही गोष्टीचं दुख: नाही
एका मुलाखतीत, जेव्हा आशा नेगीला विचारलं गेलं की, 2020 तिच्यासाठी वैयक्तिकरित्या देखील खूप आव्हानात्मक आहे का? तेव्हा आशाने याला सहमती दिली आणि सांगितलं की, तिला कोणत्याही गोष्टीबद्दल मी दुःखी नाही. कारण आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवून जाते. त्यामुळे आता ती या सगळ्यांच्या पुढे गेली आहे. या ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी तिने स्वत:ला खूप पुश केलं आणि आज तिची स्थिती चांगली आहे.


पवित्र रिश्ताच्या सेटवर सुरु झाली होती लव्हस्टोरी
पवित्र रिश्ताच्या सेटवर आशा नेगी आणि रित्विक धनजानी यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली. या शोमध्ये दोघांनी पती-पत्नीची भूमिका साकारली होती आणि पडद्यावर त्यांची जोडी लोकांसाठी खूप हिट होती. सेटवरच दोघं एकमेकांच्या जवळ आले. आणि अशा प्रकारे त्यांच्या पवित्र नात्याला सुरुवात झाली. लवकरच त्यांच्या प्रेमाच्या बातम्या मीडियामध्येही येऊ लागल्या. दोघांचं नातं 2013 मध्ये सुरू झालं आणि 2020 पर्यंत टिकलं. पण 7 वर्षांनंतर दोघांनी वेगळा होण्याचा निर्णय घेतला.