मुंबई : बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून लांब असलेली अभिनेत्री मल्लिका शेरावत 'वेब सीरिज'च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर यायला सज्ज झालीय. 'बू सबकी फटेगी' या हॉरर विनोदी सीरिजमध्ये ती झळकणार आहे. ती सध्या वेब सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच झलेल्या एका मुलाखतीत तिला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.... यावेळी तिने अद्याप आपण 'विवाहीत' नसल्याचं स्पष्ट केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ती म्हणाली की, 'माझे लग्न झालेले नाही, मी अजूनही सिंगल आहे, जेव्हा अशा अफवा पसरतात तेव्हा मोठा धक्का बसतो. कारण याचा प्रत्यक्ष अनुभव मला आला आहे. गेल्या आठ महिन्यापासून मी पॅरीसमध्ये गेले नाही. माझा पासपोर्ट या गोष्टीचा एकमेव साक्ष आहे'. मल्लिका एका फ्रेंच मुलाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर तिने झालेल्या मुलाखतीत सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. 


मल्लिकाने गुप्तरित्या बॉयफ्रेंड सायरिल ऑक्सनफँस याच्यासोबत लग्न केल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. सूत्रांच्या माहितीनुसार मल्लिकाला तिचे लंडनमधील घर खाली करण्याचे आदेश दिले होते. घराचे भाडे थकवल्यामुळे फ्रेंच न्यायालयाकडून तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. 


अभिनय क्षेत्रात पुन:पदार्पण केलेली मल्लिका कितपत यश संपादन करेल, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 'बू सबकी फटेगी' सीरिजमध्ये मल्लिका व्यतिरीकित कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, शेफाली जरीवाला, साक्षी प्रधान, श्वेता गुलाटी, अनिल चरणजीत आणि संजय मिश्रा हेदेखील झळकणार आहे.