मुंबई : अभिनेत्री आलिया भट्टने फार कमी कालावधीत कलाविश्वात स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. अभिनयाच्या प्रवासात तिने अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत स्क्रिन शेअर केली आहे. आलियासोबत काम करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये रणवीर सिंगचं देखीव नाव आहे. 'गली बॉय' चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना फार आवडली. आता रणवीर आणि आलिया 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या चित्रपटाची शुटींग सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान नव्या वेळात सेटवर रॅपिड फायरचा खेळ रंगला. या खेळात करणने  आलियाला प्रश्न विचारले. या गंमती जमतीचा व्हिडीओ करणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. करण, आलिया भट्टला तिच्या आवडत्या गाण्यांबद्दल विचारतो. त्यानंतर करण जोहरने आलियाला रॉकी म्हणजेच रणवीर सिंग कुठे आहे असे विचारले.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)


या प्रश्नाचं उत्तर देताना ती म्हणाली, तो शुटिंग करत आहे. त्यानंतर स्वतःची बाजू सावरत तो वर्कआऊट करत आहे असं म्हणाली. सध्या आलिया आणि करणचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


आलियाच्या या रॅपिड फायरवर रणवीर सिंगची मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. करण जोहरच्या पोस्टवर कमेंट करताना रणवीर सिंग लिहितो- मी तुम्हा दोघांना एका सेकंदासाठीही एकटे सोडू शकत नाही.


 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'  चित्रपटात धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी हे कलाकारही दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे करण जोहर 5 वर्षांनंतर दिग्दर्शनात पाऊल ठेवणार आहे. 'ए दिल है मुश्कील' चित्रपटानंतर करणने  'रॉकी और राणी की प्रेम कहानी'  चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे.