मुंबई : प्रत्येक स्त्री ही तिच्या मुलांसाठी नेहमीच हळवी असते. मग एखादी सर्व सामन्य स्त्री असो की मग एखादी सेलिब्रिटी असो. आई ही आई असते. मात्र असाच एक हळवा किस्सा एका मराठमोळ्या अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. याता एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून पंचक फेम अभिनेत्री आरती वडबगावकर आहे. तिचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चांगलंच चर्चेत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच आरती वडबगावकरने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये आरती हा खुलासा केला आहे. आरतीने IVF पद्धतीने तिच्या बाळाला जन्म दिला आहे. तब्बल १२ दिवसांनंतर तिने तिच्या बाळाला पाहिलं होतं. असंही ती या मुलाखती म्हणाली. एवढंच नव्हेतर तिने तिच्या बाळाला जन्म दिल्यानंतर तिच्या बाळाला NICU मध्ये ठेवण्यात आलं होतं. 
 
याविषयी बोलताना अभिनेत्री आरती वडबगावकर म्हणाली, "बाळाचं प्लॅनिंग करण्यापूर्वी आम्ही नॉर्मल मेडिकल चेकअप केलं होतं. त्यात नैसर्गिकरित्या मला आई होण्यामध्ये काही अडचणी असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे मग आम्ही IVF चाचणी द्वारे बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला. पण, आमची पहिली  चाचणी फेल गेली. हा सगळा प्रवास खूप त्रासदायक असतो. या काळात मी इंडस्ट्रीत काम करणं सुद्धा बंद केलं होतं. पण, त्यामुळेच मी कलरछाप हा ब्रँड सुरु करु शकले. त्यानंतर मी पुन्हा बाळासाठी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. पण, माझी सगळीच प्रेग्नंसी खूप त्रासदायक होती. माझं बाळ वेळेपूर्वीच  जन्माला आलं. त्यामुळे त्याचं वजन कमी होतं. तो फक्त ९०० ग्रँमचा होता. त्याला NICU मध्ये ठेवलं होतं.   लवकर जन्माला आलेली मुलं मोठी होतात वगैरे. पण, त्यावेळीचा प्रत्येक क्षण, दिवस कठीण असतात.


 मी माझ्या बाळाला जन्माच्या १२ दिवसांनंतर पहिल्यांदा पाहिलं.कारण, त्याला लगेच NICU मध्ये नेलं. माझी डिलिव्हरी झाल्यानंतर NICU चे डॉक्टर त्याला न्यायला तयारच होतं. बाळाचं वजन कमी असल्यामुळे त्याला NICU मध्ये नेण्यात आलं. त्याला नेण्यापूर्वी मी फक्त डॉक्टरांचं बोलणं इतकंच ऐकलं होतं की, 'आपण आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करुयात'. पण, हे त्यांचे शेवटचे शब्द ऐकले आणि मला भूल दिली होती त्यामुळे मला भूल चढली. मात्र, त्यांचं हे वाक्य ऐकल्यावर मला माहित नव्हतं की पुढे काय होणार आहे" असंही आरती यावेळी या मुलाखतीमध्ये म्हणली. तिचं हे वक्तव्य सध्या खूप चर्चेत आहे.