मुंबई : सध्या राज्यात सुरू असलेल्या सत्तेच्या चढाओढीत बॉलिवूड नायक अनिल कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या राज्यात मुख्यमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु आहे. यादरम्यान नायक सिनेमात एक दिवसाच्या सीएम पदाचा अनुभव असलेल्या अनिल कपूर यांना सीएम बनवा अशा मिम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर अनिल कपूर यांनी मुझे सीएम नही बनना, मै फिल्मों का नायकही ठीक हूं, अशी प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनिल कपूर यांच्या हस्ते पुण्यात मलबार गोल्ड अँड डायमंड्स या ज्वेलरी शॉपचं उदघाटन करण्यात आलं. उदघाटनसाठी आलेल्या अनिल कपूर यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनिल कपूर यांनी पुणेकर चाहत्यांसोबत ठेकाही धरला. इथलं वतातवरण आणि लोक बघून आपल्याला पुण्यात राहायक आवडेल अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली. 


सध्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात नेमकी कोणाची सत्ता येणार? मुख्यमंत्री कोण होणार? याविषयीच्याच चर्चा सुरु आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणी व्हावं, याविषयी नेटकरीसुद्धा आपापली मतं, पर्याय मांडत आहेत. या पर्यायांमध्ये चक्क बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांचं नाव नेटकऱ्यांकडून सुचवलं गेलंय. 



  


रुपेरी पडद्यावर अनिल कपूर यांनी प्रभावीपणे मुख्यमंत्र्याची भूमिका साकारली होती. 'नायक' या चित्रपटातील त्याची ही भूमिका चांगलीच गाजली. याचाच आधार घेत एका युजरने ट्विट करत, 'महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरत नाही, तोपर्यंत अनिल कपूर यांनाच मुख्यमंत्री करुन पाहावं. रुपेरी पडद्यावर त्यांची मुख्यमंत्रिपदाची एकदिवसीय कारकिर्द सर्वांनीच पाहिली आहे. त्याची सर्वांनी प्रशंसाही केली आहे.' असं म्हणत युजरने, अनिल कपूर यांची प्रशंसा करत, थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांना कसला विचार करताय, असा प्रश्नही केलाय.