मुंबई : लोकप्रिय निर्माता-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कायमच आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकतात आणि चर्चेत राहतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असंच वक्तव्य केलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी आता महिलांसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी राम गोपाल वर्मा यांनी म्हटलं होतं की,'मला महिलांचं शरीर आवडतं. पण मला त्यांचं डोकं आवडत नाही.' या त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर खूप टीका देखील झाली होती. आजही ते आपल्या या वक्तव्यावर ठाम आहेत. 


ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा म्हणतात की,'डोक्याला कोणतंही जेंडर नसतं. म्हणजे महिलेला डोकं नसतं आणि पुरूषाला डोकं असतं. लैंगिक पैलू खूप विशिष्ट आणि ठराविक आहे. एका महिलेकडे एक अतिरीक्त वस्तू असते जी तिची कामुकता आहे आणि ज्याची मी प्रशंसा करतो.' पुढे राम गोपाल वर्मा म्हणाले की, 'Guns & Thighs' या पुस्तकातही मी म्हटलंय मला महिलांच शरीर आवडतं पण मला त्यांचं डोकं आवडतं नाही.'



तुम्ही महिलांबद्दल असा विचार का करता? असा सवाल जेव्हा राम गोपाल वर्मा यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले की, 'मी आता माझं मत का बदलू? बदलण्यासाठी आता काहीच नाही.' पुढे ते असं देखील म्हणाले की,'मी कोणत्या नात्यात देखील नाही. भावनीक होत मी कुणातच अडकलो नाही. मी आता खूप व्यस्त आगे.' राम गोपाल वर्मा पुढे असं ही म्हणाले की,'मला लग्न या व्यवस्थेवरही विश्वास नाही.'