मुंबई : टीव्ही इंडस्ट्री ते बॉलिवूडच्या पडद्यावर आपली छाप पाडणारी अभिनेत्री मृणाल ठाकूरला तिच्या ऑडिशनचे दिवस आठवले आहेत. 2012 मध्ये मृणालने 'मुझसे कुछ कहते हैं.. ये खामोशियां' या मालिकेतून टीव्ही इंडस्ट्रीत एंट्री घेतली. मात्र 'कुमकुम भाग्य' या टेलिव्हिजन शोमधून तिला लोकप्रियता मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर अभिनेत्रीने 'लव्ह सोनिया' या ड्रामा फिल्मद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश घेतला. ती 'सुपर ३०', 'बाटला हाऊस' आणि 'धमाका' सारख्या चित्रपटात दिसली. मृणाल आता तिचा आगामी चित्रपट 'जर्सी'च्या प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहे. तिच्या या प्रवासाविषयी बोलताना ती म्हणाली, "मी माझं आयुष्य जगत आहे. मला लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचायचं आहे. 'कुमकुम भाग्य'ने मला साथ दिली. जीवनाचं एकमेव ध्येय आहे. लोकांचं मनोरंजन करत रहा."


"मी खूप नशीबवान आहे की, मला ही संधी मिळाली. अनेक टीव्ही कलाकार या संधीची वाट पाहत असतात. मी खूप मेहनत घेतली आहे. मी खूप संघर्ष केला आहे. मी निर्लज्जपणे ऑडिशनसाठी उभी राहीली आहे. जोपर्यंत माझा टेक घेतला जात नाही तोपर्यंत मी तिथे उभी रहायचे. मी खूप हट्टी होते आणि अजूनही आहे."


याचबरोबर ती हॉलीवूडची दिग्गज मेरील स्ट्रीपची फॅन आहे.  मृणाल म्हणाली, "एकेकाळी अभिनेत्रींमध्ये सेल्फ लाइफ असायची, तिच्याकडे काम असायचं, पण आता ओटीटी आलं आहे. शेफाली शाह असो किंवा माधुरी दीक्षित नेने, या वयातही लोकं त्यांना खूप पसंती देतात."