लोणावळामध्ये साताऱ्याच्या कास पठारचा फिल! 7 वर्षातून एकदा फुलणाऱ्या कारवी फुलांचा बहर

लोणावळ्यातील पठारांवर दुर्मिळ फुल बहरली आहेत. 

| Sep 22, 2024, 18:52 PM IST

LONAVALA-Karvi Flower Festival : जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पठार फुलालांनी बहरलंय.. रंगी बेरंगी विविध रांगांची फुलं कास पठारावर बहरली आहेत. फुलांचा बहर पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. सातऱ्यातील या कास पठारचा फिल लोणावळामध्ये देखील घेता येईल. लोणावळ्यातील पठारांवर फिरताना साताऱ्याच्या कास पठारचा फिल येईल. लोणावळ्यात  7 वर्षातून एकदा फुलणाऱ्या कारवी फुलांचा बहर आला आहे. 

1/8

दुर्मिळ फुलांनी साता-यातील कास पठार बहरून गेलंय. कास पठार प्रमाणे लोणावळ्यातही रंगीत फुलांचा फुलोत्सव पहायला मिळत आहेत. 

2/8

लव्हेंडर रंगाच्या या फुलांमुळे लोणावळ्याचे सौंदर्य अधिक खुलले आहे. कारवी फुलांसह पिवळ्या रंगाची सोनकी फुल देखील बहरली आहेत. 

3/8

लोणावळा लायन्स पाईंट कडून कोरीगड किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर दुर्तफा असलेल्या पठावरांवर ही फुल बहरली आहेत. 

4/8

लोणावळ्यातील पठारांवर  कारवी फुलांचा बहर आला आहे. ही फुल सात वर्षातून एकदाच बहरतात. 

5/8

राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ला ही लोणावळ्यातील लोक्परिय पर्यटनस्थळ आहेत.   

6/8

हिरवेगार डोंगर आणि दाट धुकं असं सुंदर वातावरण लोणावळ्यात पहायला मिळते.   

7/8

मुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून 625 मीटर उंचीवर सह्याद्रीच्या घाटमथ्यावर लोणावळा आहे. लोणावळा  पुण्यापासून रस्त्याने 64 किमी तसेच मुंबईपासून 96 किमी अंतरावर आहे. 

8/8

लोणावळा हे महाराष्ट्रातील लोकप्रिय हिल स्टेशन आहे. देश विदेशातून पर्यटक लोणावळ्यात फिरण्यासाठी येतात.