Koffee With Karan 8: लग्नाच्या विषयावरुन  निर्मात करण जोहर याला नेहमीच ट्रोल केले जाते. त्यातच त्याचा  'कॉफी विथ करण' (Koffee With Karan ) हा चॅट शो देखील नेहमीच वादाचा विषय ठरतो. याच शोमध्ये करण जोहर याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचे नाव घेत करण याने मोठं वक्तव्य केले आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 'कॉफी विथ करण या शोचा आठवा  सीझन सुरु आहे.  दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मुली अर्थात कपूर सिस्टर्स या शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि खुशी कपूर (Khushi Kapoor) यांनी या शो ला हजेरी लावली. यावेळी कपूर सिस्टर्स समोर करण जोहर याने आपल्या आयुष्यातील खूप मोठे सिक्रेट शेअर केले. 


श्रीदेवीच्या प्रेमात वेडा होतो


करण जोहर याने कपूर सिस्टर्स सोबत संवाद साधताना आपण श्रीदेवी यांचे खूप मोठे चाहते होतो असे सांगितले. ऐवढ्यावरच करण थांबला नाही तर, मी श्रीदेवीच्या प्रेमात वेडा झालो होतो असेही त्याने  जान्हवी आणि खुशी यांना सांगितले. जेव्हा मी पहिल्यांदा श्रीदेवी यांना भेटलो तेव्हा त्यांचा ऑरो पाहून मी त्यांच्या प्रेमातच पडलो. मि. इंडिया चित्रपटाच्या प्रिमीयर शोच्या वेळेस श्रीदेवी यांच्याशी पहिली भेट झाली. यानंतर  'गुमराह' चित्रपटाच्या फोटोशूटवेळी देखील माझी आणीि श्रीदेवीची भेट झाली. श्रीदेवीला पाहून मला धडधडत होते. मात्र, तुम्ही खूप सुंदर दिसत आहात असं बोलण्याची माझी हिंमत झाली नाही. खूपच घाबरलो होतो असे करण जोहर याने कपूर सिस्टर्सना सांगितले. 


करण जोहरने लग्न का केले नाही?


करण जोहर (Karan Johar) हा बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक आणि निर्माता आहे. वयाची पन्नाशी गाठली तरी करण जोहर याने लग्न केलेले नाही. एका मुलाखतीत करण जोहर याने लग्न का केले नाही याबाबत खुलासा केला आहे. माझ्या आयुष्यात लग्न ही गोष्ट नव्हती. त्यामुळे मी नाही केलं. लग्न न करण्याचा निर्णय माझा वैयक्तिक आहे. लग्न करण्याचा निर्णय हा तुमचा वैयक्तिक निर्णय असतो. लग्न करण्यासाठी आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुमच्यावर कोणी दबाव टाकत असेल तर दबावाला बळी न पडता त्याला विरोध केला पाहिजे असे करण या मुलाखतीत म्हणाला होता.