मुंबई : स्टारकिड्स म्हटलं तर कायम मज्जा, मस्ती आणि रात्री उशीरापर्यंत चालणाऱ्या पार्ट्या... अनेकदा स्टारकिड्सला पार्टी करताना स्पॉट करण्यात आल आहे. त्यामधील एक म्हणजे अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम खान. इब्राहिमचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल होत असतात. मध्यंतरी इब्राहीमचं नाव अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसोबत जोडण्यात आलं. त्यांच्या अफेअरची चर्चा देखील तुफान रंगली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण नुकत्याच झालेल्या पार्टीच्या फोटोमध्ये इब्राहिम एका मुलीसोबत दिसत असून ही मुलगी बॉलिवूड अभिनेत्याची मुलगी आहे. इब्राहिम अली खान सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. इब्राहिमने अद्याप बॉलिवूडमध्ये एन्ट्री केलेली नाही, पण फक्त स्टारकिड असल्यामुळे तो चर्चेत असतो. 



पलकनंतर इब्राहिमसोबत असणारी मुलगी कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. इब्राहिमसोबत दिसणारी ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता अर्जुन रामपालची मुलगी माहिका (Mahikaa Rampal)  आहे. 


माहिका ही अर्जुन आणि पहिली पत्नी मेहरची मुलगी आहे. माहिका 20 वर्षांची आहे. माहिका सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर मात्र कायम ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.