Ibrahim Ali Khan Troll : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खाननं अजून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं नाही, तरी इब्राहिम हा लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. इब्राहिम आणि पलक या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात येते. आता त्या दोघांचा आणखी एका ठिकाणी स्पॉट करण्यात आले आहे. पण त्यानंतर असे काही झाले की अनेकांनी इब्राहिमला उद्धट म्हणत त्याला ट्रोल केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सगळ्यात आधी इब्राहिम आणि पलक एकाच ठिकाणी चित्रपट पाहायला गेल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्या दोघांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याचे पाहायला मिळते. पलकनं काळ्या रंगाची स्पोर्ट्स ब्रा परिधान केली असून त्यावर काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. तर दुसरीकडे इब्राहिमनं पांढऱ्या रंगाचं टी-शर्ट आणि काळ्या रंगाचं शर्ट परिधान केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, त्यानंतर त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत इब्राहिम हा थिएटरच्या बाहेर आल्याचे दिसत आहे. यावेळी इब्राहिमच्या हातात पलकचं जॅकेट आहे. तर दुसरीकडे फोनवर तो बोलताना दिसतो की हां, 'तुम आ जाओं, यहां कुछ मीडिया है... मीडिया मेरे मुंह में घुस गया है.' त्यावर लगेच पापाराझी त्याला असं बोलू नकोस असं बोलताना दिसतात. पुढे सतत कोणी ना कोणी त्याला आवाज देत असल्याचे पाहून इब्राहिम हा भाऊ मी इथेच आहे असं बोलताना दिसतो. त्यानंतर तो त्याच्या गाडीत बसून निघून जातो. तर यावेळी पलक त्याच्यासोबत बाहेर येताना दिसली नाही. त्या दोघांना एकत्र स्पॉट व्हायचे नसेल त्यामुळे त्यांनी असे केले असावे असे अनेकांचे म्हणणे आहे. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं शेअर केली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'सेक्स आणि हिंसा विषयावर असलेल्या वेब सीरिज मी...', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचं वक्तव्य चर्चेत


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


इब्राहिमचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाली की 'मीडिया तुझ्या मागेमागे यासाठी आहे कारण तुझ्या वडिलांनी बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यासाठी खूप मेहनत केली. त्यानं खूप चांगलं काम केलं आहे. तुझ्याविषयी बोलायचे झाले तर तुझ्या मागे मीडिया येईल त्याची तुझी लायकी नाही.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भावा, तुझी आजी, पप्पा, आई, सावत्र आई, बहीण यांनी बॉलिवूडमध्ये खूप चांगलं काम केलं आहे. त्यामुळे तुझे फोटो काढण्यासाठी मीडिया तुझ्या मागेमागे आहे. नाही तर त्यांनी तुझा एक फोटो पण काढला नसता. तुझी तितकी लायकी नाही.' तर काही नेटकऱ्यांनी इब्राहिमची बाजू घेतली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'मीडिया सतत खूप त्रास देते म्हणून तो संतापला असणार.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'पापाराझी त्यांच्यापासून लांब का राहत नाही. त्यांचं देखील खासगी आयुष्य आहे.'