'सेक्स आणि हिंसा विषयावर असलेल्या वेब सीरिज मी...', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचं वक्तव्य चर्चेत

Madhurani Prabhulkar on OTT Content :  मधुराणी प्रभूळकर ही 'आई कुठे काय करते' या मालिकेतील अरुंधती या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिला ओटीटी पाहण्याची प्रेक्षकांची इच्छा असताना ओटीटीवर असलेल्या कॉन्टेन्टवर मधुराणीनं काय प्रतिक्रिया दिली आहे ते जाणून घ्या.   

दिक्षा पाटील | Updated: Jul 23, 2023, 04:17 PM IST
'सेक्स आणि हिंसा विषयावर असलेल्या वेब सीरिज मी...', 'आई कुठे काय करते' फेम मधुराणीचं वक्तव्य चर्चेत title=
(Photo Credit : Social Media)

Madhurani Prabhulkar on OTT Content : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ही मालिका सगळ्यांच्याच लक्षात आहे. या मालिकेतील सगळेच कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या पोस्ट व्हायरल होताना दिसतात. सगळ्यांचा मनावर राज्य करणाऱ्या मधुराणीनं आता ओटीटीच्या माध्यमातूनही आपल्या सगळ्यांच्या भेटीला यावं अशी अनेकांची इच्छा आहे. आता स्वत: मधुराणीनं त्यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. मधुराणीनं ओटीटीवर दाखवण्यात येणाऱ्या सेक्स आणि हिंसा या विषयावर असलेल्या वेब सीरिजबद्दल नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिचं मत मांडलं आहे. 

मधुराणीनं नुकतीच ही मुलाखत ‘इसापतीनी एंटरटेन्मेंट’ या यूट्यूब चॅनेलला दिली होती. त्यावेळी मधुराणीला ओटीटीवर असलेल्या कॉन्टेन्ट आणि त्याची वाढती लोकप्रियता आणि त्यात तुला काम करायला आवडेल का? असं विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देत मधुराणी म्हणाली, 'हो, मी एक-दोन स्क्रिप्टवर काम करतेय. पण त्यातली भूमिका वेब सीरिजप्रमाणे आहे का, ते मला माहीत नाही. पण, काही विचार माझ्या मनात आहेत. ज्या सध्या मी फक्त कागदावर उतरवतेय. जर इतर कोणी सीरिज करीत असेल आणि चांगली भूमिका असेल, तर मला कुठल्याही भूमिकेसाठी काम करायला आवडेल. ओटीटीमध्ये टीआरपीची फारशी बंधने नाहीत. मात्र, त्याच्यातही तोचतोचपणा आहे. वेब सीरिजमध्ये सेक्स व हिंसा या विषयांशिवाय काही चालत नाही, असं एक समीकरण तयार झालंय. पण हळू हळू हे समीकरण मोडलं जाईल. आपण चांगला विषय तयार करू आणि तोही लोक बघतायत हे दाखवून देऊ.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे मधुराणीचं उत्तर ऐकताच मुलाखत घेणारी व्यक्ती म्हणाली, 'वेब सीरिजमध्ये या दोन-तीन गोष्टी असल्यावर त्या चालतात. हे समीकरण मोडायला हवं असं म्हटलं.' हे ऐकताच मधुराणी म्हणाली, 'असं कॉन्टेन्ट असलेली सीरिज मी पाहू शकत नाही. मी बघण्याचा प्रयत्न देखील केला होता पण त्याविषयाला मी आत्मसात करू शकत नाही. कारण तो माझा स्वभाव नाही.'

हेही वाचा : रितेश देशमुखमुळे लग्नानंतर चित्रपटातून ब्रेक घेतला? जिनिलिया म्हणाली...

सेक्स आणि हिंसा या विषयांवर असलेल्या सीरिज विषयी बोलताना मधुराणी म्हणाली, 'सेक्स व हिंसा या विषयांवर असलेल्या सीरिज मी पाहू शकत नाही कारण त्या मला त्रास देतात. माझ्यासाठी डोकं शांत ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. मी जेव्हा सीरिज बघते तेव्हा फार घुसून बघते. मला छान आणि मजेशीर गोष्टी बघायला आवडतात. त्यामुळे मी तसा विषय शोधत असते. पण, असा विषय ओटीटीवर मिळणं फार मुश्कील आहे'.