मुंबई : इंडस्ट्रीमध्ये सेलिब्रिटींच्या कामाबद्दल कमी तर त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अधिक चर्चा रंगलेली असते. सेलिब्रिटींनंतर आता स्टारकिड्सच्या अफेर्सच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत असतात. स्टारकिड्स कोणत्या ठिकाणी जातात, कोणासोबत असतात, याकडे देखील अनेकांचं लक्ष असतं. त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा देखील सतत रंगत असतात. आता अभिनेता सैफ अली खानचा मुलगा  इब्राहिम अली खानच्या रिलेशनशिपबद्दल मोठं सत्य समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 इब्राहिम अली खान सध्या एका व्हिडीओमुळे तुफान चर्चेत आला आहे. एवढंच नाही तर, त्याच्यासोबत असलेली मुलगी एका प्रसिद्ध अभिनेत्री लेक असल्याचं देखील सांगितलं जात आहे. व्हायरल होत असलेला व्हिडीओ पासून नेटकरी अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. 



इब्राहिमसोबत असलेली मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आहे.  शुक्रवारी रात्री दोघांना डिनर डेटला जात असताना स्पॉट करण्यात आलं. यापूर्वी दोघे वांद्रे येथे देखील दिसले होते. 


आता व्हायरल भयानीने नव्या बॉलिवूड कपलचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये इब्राहिम बिनधास्त दिसत आहे, तर दुसरीकडे पलक चेहरा लपवताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.