मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणादरम्यान समोर आलेल्या  बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनने संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला. या प्रकरणामध्ये अनेक मोठ्या सेलिब्रिटींची नावे देखील समोर आली. यामध्ये अभिनेता सैफ अली खानची मुलगी आणि अभिनेत्री सारा अली खानचं देखील नाव पुढे आलं. ड्रग्स प्रकरणात साराचं नाव पुढे आल्यामुळे खान कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. काहीदिवसांपूर्वी एसीबीने ड्रग्स प्रकरणी साराची चौकशी देखील केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता इब्राहिम अली खानने त्याच्या बहिणीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटोमध्ये तो स्वमिंगपूलमध्ये असल्याचे दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'जर तुम्ही वाईट काळातून जात असाल तर वाईट काळ जावू द्या.' असं लिहिलं आहे. 



इब्राहिमने लिहिलेलं कॅप्शन हे  विन्सटन चर्चिल यांचा कोट आहे.  सांगायचं झालं तर, सारा आणि इब्राहिम यांच्यातील बॉडिंग प्रत्येकाला ठावूक आहे. अनेक वेळा ते दोघे एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसतात, तर कधी कार्यक्रमात देखील अनेकवेळा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. 


मात्र, ड्रग्स प्रकरणामध्ये नाव समोर आल्यानंतर सारा अली खान सोशल मीडियापासून दूर आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून तिने सोशल मीडियावर एकही पोस्ट शेअर केलेली नाही. १० सप्टेंबर रोजी तिने इन्स्टाग्रावर अखेरची पोस्ट शेअर केली होती.