`IC 814 : द कंधार हायजॅक` वेब सीरिजवर Netflix ने घेतला मोठा निर्णय; दहशतवाद्यांची खरी नावं दाखवणार
IC-814 the kandahar hijack : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत `IC 814 : द कंदहार हायजॅक` ही वेब सिरीजवर आता नेटफ्लिक्सने मोठा निर्णय घेतलाय.
IC-814 hijackers name : कंधार हायजॅक प्रकरणावर आधारीत 'IC 814 : द कंदहार हायजॅक' ही वेब सिरीज नुकतीच नेटफलिक्सवर रिलीज झाली आहे. कुख्यात दहशतवाजदी मसुद अझहर याला सोडवण्यासाठी काठमांडूवरून येणारं विमान दहशतवाद्यांनी हायजॅक केलं होतं. या घटनेवर नेटफ्लिक्सवर आलेली वेब सिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अनेकांना ही वेब सीरिज आवडली आहे पण सोशल मीडियावर दहशतवाद्यांच्या हिंदू नावांवरुन याला विरोध केला जातो. तर नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेंट चीफ मोनिका शेरगिल यांना भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने समन्स पाठवून दिल्लीत बोलावून घेतलं होतं. त्यानंतर आता नेटफलिक्सने मोठा निर्णय घेतला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्यासोबत कंटेंट चीफ मोनिका शेरगिल यांची बैठक पार पडली. 40 मिनिटांच्या दीर्घ बैठकीनंतर नेटफलिक्सने अधिकृत निवेदन जारी केलं. शोचा डिस्क्लेमर आता IC 814 च्या खऱ्या अपहरणकर्त्यांच्या खऱ्या नावांसह, त्यांनी घटनेच्या वेळी वापरलेल्या कोडनेमसह अपडेट केला आहे, असं नेटफ्लिक्सने म्हटलं आहे. आम्ही शोचे सुरुवातीचे डिस्क्लेमर अपडेट केले आहे. यामध्ये अपहरणकर्त्यांच्या खऱ्या आणि सांकेतिक नावांचाही समावेश असल्याचं नेटफ्लिक्सने सांगितलंय.
भारतात कथाकथनाची समृद्ध संस्कृती आहे आणि आम्ही या कथा प्रामाणिक प्रतिनिधित्वासह दाखवण्यासाठी वचनबद्ध आहोत, असंही कंटेंट चीफ मोनिका शेरगिल यांची म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर याबाबत अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे. ही वेब सीरिज एका सत्य घटनेवर आधारीत आहे. याचा विचार करुन वेब सीरिजमध्ये काही गोष्टींचा अवलंब केला पाहिजे. या वेब सीरिजच्या सुरुवातीलाच सांगण्यात आलंय की, IC 814: The Kandahar Hijack Story हायजॅक केलेल्या कॅप्टन देवी शरण यांच्या पुस्तकावर आधारित आहे. या पुस्तकाला आतापर्यंत 24 वर्षे झाले आहे. हे पुस्तक हजारो लोकांनी खरेदी करुन त्यांनी वाचलं देखील असेल.
काठमांडूवरुन जे विमान दिल्लीत जात होत त्यामधील दहशतवाद्यांनी लोकांचा संभ्रम निर्माण करण्यासाठी कोडनावांचा उल्लेख केला होता. ज्याचा वापर या वेब सीरिजमध्ये करण्यात आला आहे. जसं की, चिफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर... शेवटच्या दोन नावांवर हिंदू प्रेक्षकांनी विरोध दर्शवला आहे. दहशतवाद्यांनी आपली स्वतःची ओळख लपवण्यासाठी अशा पद्धतीच्या नावांचा उल्लेख केला आहे, पुस्तकामध्ये याबाबत उल्लेख केला आहे.