मुंबई : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरूख खान. शाहरूख कलाविश्वाचा किंग ठरला पण त्यांची लव्ह स्टोरी देखील एका फिल्मी कथेपेक्षा कमी नाही. आज प्रत्येकाला माहिती आहे शाहरूख आणि गौरीची लव्ह स्टोरी.  शाहरूख आणि गौरी कामय त्यांच्या चाहत्यांना लव्ह गोल्स देत असतात. शहरूखने अनेक मुलाखतींमध्ये देखील त्यांच्या लग्नबद्दल बोलतो. आता देखील सोशल मीडियावर शाहरूखचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत असतो. व्हिडिओमध्ये बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री फरीदा जलाल देखील दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओमध्ये फरीदा जलाल शाहरूखला एक प्रश्न विचारतात. गौरी जर म्हणाली 'मला तुझा वैताक आलाय आणि मी तुला सोडून जात आहे?' तर तुझं उत्तर काय असेल. यावर शाहरूख म्हणाला, 'पहिली गोष्ट तर असं कधीचं होणार नाही. असं झालं जरी मी कपडे फाडून रस्त्यावर उभा राहुन गौरीसाठी गाणं म्हणेल...'



पुढे शाहरूख म्हणाला, 'मी असं केल्यानंतर गौरी परत नक्की येईल.' सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शाहरूखनंतर आता त्यांची मुलगी सुहाना खान तुफान चर्चेत आहे. शिवाय वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सुहाना देखील अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. 


शाहरूखच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, शाहरूखचे चाहते त्याच्या बहूचर्चीत 'पठान' चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. शहारूखने चित्रपटासाठी 100 कोटी मानधन स्वीकारलं असल्याचं सांगण्यात येत आहे. चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादूकोन आणि जॉन अब्राहम सुद्धा मुख्य भुमिकेत दिसणार आहेत.