VIDEO : `मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती`; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन
Salman Khan On Aishwarya Rai: सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे आपण ब्रेकअप केल्याचं ऐश्वर्या रायने सांगितलं होतं. पण हे आरोप सलमानने फेटाळून लावताना म्हटलं आहे की, मी तिला मारलं असतं ती...
Salman Khan On Aishwarya Rai : बॉलिवूडमधील सर्वात गाजलेली लव्ह स्टोरी आहे बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची...त्यानंतर दुसरी प्रेम कहाणी आहे ती अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय आणि सलमान खानची...या प्रेमकहाणीची आजही चर्चा होताना दिसते. खरं तर त्यांचं प्रेम अपूर्ण राहिलं. ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन यांच्या मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं. पण आजही ऐश्वर्याचा उल्लेख झाला की आपसुकच सलमानचं नाव येतंच. (If I hit aishwarya rai she would not be alive Salman Khan remained silent on the allegation of assault video viral)
ही प्रेम कहाणी अधुरी राहिली याबद्दल ऐश्वर्या राय बच्चन हिने 2002 मध्ये खुलासा केला होता. सलमान खानच्या मद्यधुंद वागणुकीचा, बेवफाईचा आणि अपमानामुळे तिने हे नातं संपवलं आहे. ऐश्वर्या हिने अभिषेकसोबत नवीन आयुष्याला सुरुवात केली मात्र सलमान खान आजही अविवाहित आहे.
ऐश्वर्या राय म्हणाली होती की, ''मी कामावर जाताना अशी जायची जणू काही घडलंच नाही आहे. जेव्हा कधी मी सलमानचा फोन उचलला नाही तेव्हा तो मला मारहाण करायचा आणि शारीरिक इजा करायचा. म्हणूनच कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीप्रमाणे मी त्याच्याशी माझं नातं संपवलं.''
'मी ऐश्वर्याला मारलं असतं तर ती वाचली नसती'
ऐश्वर्या रायने केलेल्या मारहाणीच्या आरोपावर सलमान खानने अखरे मौन सोडलं आहे. एका मुलाखती महिला पत्रकाराने सल्लूमियाला या बद्दल प्रश्न विचारलं. त्यावर सलमान खान म्हणाला की, काही दिवसांपूर्वी प्रभु चावलाने हा प्रश्न मला विचारला तेव्हा मी टेबलवर हात मारला आणि टेबल तुटला का असंच सगळ्यांना वाटलं. मी कोणाला मारतोय तर आमच्यात वाद सुरू आहे हे जाहीर होतो. जर मी तिला मारहाण केलं तर ती जिंवत राहिली नसती. दरम्यान या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल व्हिडीओवर पुन्हा एकदा व्हायर झाला आहे.
'टायगर 3' दिवाळी होणार रिलीज
सध्या सलमान खान त्याच्या आगामी टायगर 3 चित्रपटामुळे चर्चेत आहे. टायगर 3 मध्ये सलमान खानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी दिसणार आहे. दिवाळी हा चित्रपट येणार असल्याने चाहते वाट पाहत आहेत.