इलियाना डिक्रूजनं बॉयफ्रेंड मायकलसोबत लग्नावर सोडलं मौन! 2023 मध्ये केला विवाह?
Ileana D`cruz : इलियाना डिक्रुजनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाविषयी वक्तव्य केलं आहे.
Ileana D'cruz : बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूज ही गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. इलियाना गेल्या वर्षी आई झाली. तिनं 1 ऑगस्ट 2023 रोजी मुलाला जन्म दिला. इलियानानं जेव्हा तिच्या प्रेग्नंसीची घोषणा केली तेव्हा तिचा पार्टनर कोण आहे? तो काय करतो? कुठे राहतो अशा सगळ्या गोष्टींची चर्चा सुरु होती. तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे होते. दरम्यान, आता इलियानानं आई झाल्यानंतर पहिल्यांदा मुलाखत दिली असून त्यावेळी तिच्या लग्नाविषयीच्या चर्चांवर वक्तव्य केलं आहे.
इलियानानं नुकतीच ही मुलाखत 'टाइम्स ऑफ इंडिया' ला दिली होती. त्यावेळी बोलताना इलियाना म्हणाली की 'पोस्टपार्टम डिप्रेशन खरंच असतं, त्यासाठी तुम्हाला कोणी तयार करु शकत नाही. मी भाग्यवान आहे की माझ्याघरी मला सपोर्ट करणारे होते आणि डॉक्टरांची टीम होती. जे माझ्याकडे लक्ष देत होते. इलियानानं पुढे म्हटलं की मला आठवण आहे की मी माझ्या रुममध्ये होते आणि रडायला लागले. माझ्या पार्टनरनं मला विचारलं की मी का रडते तर मी म्हटलं कारण माझा मुलगा दुसऱ्या रुममध्ये झोपलाय आणि मी त्याला मिस करते.'
लग्नाच्या चर्चांवर इलियानाचं वक्तव्य
इलियानानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या आई होण्यावर वक्तव्य करताना दिसते. पण ती कधीच तिच्या पार्टनरविषयी जास्त काही शेअर करताना दिसत नाही. जेव्हा इलियानाला विचारलं की तिनं 2023 मध्ये मायकलशी लग्न केलं? त्यानंतर उत्तर देत इलियाना म्हणाली, 'अशा अनेक अफवा आहेत, त्याला दुर्लक्ष करते. थोडी मिस्ट्री असणं गरजेचं आहे. खरं सांगायचं झालं तर मी अजून माझ्या आयुष्यातील त्या गोष्टीवर किती चर्चा करायची आहे हे ठरवू शकली नाही. लोक पाठीमागे काय बोलतात हे मला आवडत नाही. मी माझ्याविषयी बोलण्यात आलेल्या गोष्ट सहन करू शकते पण माझ्या पार्टनर विषयी किंवा कुटूंबाविषयी काहीही वाईट किंवा चुकीचं बोलेलं सहन करू शकत नाही.'
हेही वाचा : 'त्याच्यासाठी मी रस्त्यावर...', लग्नात बनियानवर आलेला नुपूर ट्रोल होताच आयराचं सणसणीत उत्तर
इलियाच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर ती कतरिनाचा भाऊ सेबेस्टियनला डेट करते अशा चर्चा सुरु होत्या. तर मायकल आधी ती फोटोग्राफर एन्ड्यू नीबोनला डेट करत होती.