मुंबई : अभिनेत्री इलियाना डिक्रूझने अलीकडेच स्वयंपाक करताना तिच्यासोबत घडलेली घटना सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितली आहे की, अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, स्वयंपाक करताना तिच्या हाताची दोन बोटे कापली गेली. इलियानाने सोशल मीडियावर यासंबंधीची एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीने सांगितलं आहे की, या घटनेनंतर बोटांवर बँडेज लावत ती लहान मुलांसारखी रडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करत इलियानाने लिहिलं की, 'स्वयंपाक करताना माझी दोन बोटे कापली होती. त्यानंतर बोटाला बँडेज करत मी लहान मुलासारखी रडले'. यानंतर इलियानाने फॉलोअप पोस्टमध्ये लिहिलं की, 'ही काही पहिली वेळ नाही, मी याआधीही अनेकवेळा अशी बोटे कापली आहेत. मला आश्चर्य वाटतं की आतापर्यंत माझी बोटे कशी सुरक्षित आहेत!'



बोटे कापल्यानंतर इलियाना रडत रडत म्हणाली, 'रडायला किती लाज वाटते'.
याआधी अभिनेत्रीचा मुंबई विमानतळाशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये इलियाना विमानतळावर उपस्थित फोटोग्राफर्सशी बोलताना दिसली आणि यादरम्यान तिने एका फोटोग्राफरला योग्य प्रकारे मास्क घालण्याचा सल्ला दिला. इलियाना हे साऊथ सिनेसृष्टीतील मोठं नाव आहे. त्याने 2012 मध्ये 'बर्फी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.